भारताविरुद्ध क्रिकेट खेळलो नाही, तर आम्ही उपाशी मरणार नाही. असा दावा काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांच्याकडून केला गेला. 2012-13पासून भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका झालेली नाही. भारताविरुद्ध न खेळण्यानं फरक पडत नसल्याचा दावा पीसीबी करत असले तरी वस्तुस्थिती काही वेगळेच चित्र सांगते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धेतच भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात.
'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र
सूत्रांच्या माहितीनुसार या पाच वर्षांत पीसीबी घरच्या मैदानावर भारताविरुद्ध दोन मालिका खेळणं अपेक्षित होते. त्यानुसार 149 मिलियन डॉलरचा प्रक्षेपण करारही झाला होता. त्यासाठी दोन ब्रॉडकास्टरनी पीसीबीला पैसे दिले होते. पण, पाकिस्तान दौऱ्यावर येण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) ते तयार करू शकले नाही. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सनी त्यांच्या करारातील 90 मिलियन डॉलर म्हणजे 691कोटी कमी केले.
''भारताविरुद्ध दोन मालिकांचे आयोजन करण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यानं टेन स्पोर्ट्स आणि पीटीव्ही या दोन ब्रॉडकास्टर्सनी करारातील 90 मिलियन रक्कम कमी केली,'' असे वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान गतवर्षी आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत अखेरचे भिडले होते. भारतानं डकवर्थ लुईस प्रणालीनुसार 89 धावांनी हा सामना जिंकला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला
IPL 2020 होणार?; BCCI समोर 'या' देशानं ठेवला स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव!
Video: सराव, कपडे धुणे, जेवण बनवणे; लॉकडाऊनमध्ये रोहित शर्मा काय करतो?