PCB Wants BCCI to Provide Written Proof, India vs Pakistan Champions Trophy 2025 PCB: पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सध्या आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला संघ पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच BCCIने आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तेव्हापासून PCB सतत BCCI च्या नावाने खडे फोडताना दिसत आहे. तशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने BCCI कडे त्यांचे उत्तर लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली आहे.
श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये १९ जुलैला होणार आयसीसी परिषद
सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याचे BCCI ने लेखी द्या, असे पीसीबीने म्हटले आहे. पीसीबीच्या एका सूत्राने ही माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ही स्पर्धा होणार असल्याने या प्रकरणावर निर्णय व्हावा, अशी यजमान पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ची वार्षिक परिषद १९ जुलै रोजी कोलंबो येथे होणार आहे. या बैठकीत 'हायब्रिड मॉडेल'वर चर्चा होणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे त्यामुळे भारतीय संघ युएईमध्ये आपले सामने खेळणार आहे असेच मानले जात आहे.
पाकिस्तानात येणार नाही, असे लिहून द्या!
पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, जर भारत सरकारने परवानगी दिली नसेल तर तसे लेखी द्यावे लागेल आणि बीसीसीआयने ते पत्र आयसीसीला त्वरित द्यावे. आम्ही सातत्याने म्हणत आहोत की बीसीसीआयने आयसीसीला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणारा संघ ५ ते ६ महिने अगोदर लेखी कळवावा. BCCI ने नेहमीच असे म्हटले आहे की पाकिस्तानमध्ये खेळण्याचा निर्णय सरकारचा असेल आणि २०२३च्या वनडे आशिया चषकातही भारताचे सामने हायब्रिड मॉडेलवर श्रीलंकेत खेळले गेले.
आताच्या वेळापत्रकात भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये!
पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सादर केला आहे, ज्यात भारताचे सर्व सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम सामने लाहोरमध्ये होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १ मार्चला होणार आहे. स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारीला कराचीमध्ये होईल आणि अंतिम सामना ९ मार्च रोजी लाहोरमध्ये होईल. फायनलसाठी एक दिवस राखीव असेल.
Web Title: Pakistan cricket board PCB wants BCCI to provide written proof Indian government refused permission to play champions trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.