IPL vs PSL: पाकिस्तान सुपर लीगनं IPLला मागं टाकलं; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी यांचा दावा

pakistan super league 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 01:01 PM2023-03-19T13:01:06+5:302023-03-19T13:03:56+5:30

whatsapp join usJoin us
 Pakistan Cricket Board President Najam Sethi has claimed that Pakistan Super League has overtaken IPL in terms of digital viewership  | IPL vs PSL: पाकिस्तान सुपर लीगनं IPLला मागं टाकलं; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी यांचा दावा

IPL vs PSL: पाकिस्तान सुपर लीगनं IPLला मागं टाकलं; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी यांचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PCB Chief Najam Sethi on IPL । नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. यावेळी पाकिस्तान सुपर लीगची (PSL) डिजिटल व्ह्यूअरशिप आयपीएलपेक्षा (IPL) जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेटसाठी ही मोठी बाब असल्याचे सेठी यांनी सांगितले. शनिवारी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना खेळवला गेला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोर कलंदर्सच्या संघाने पीएसएल 8चा किताब पटकावला.

दरम्यान, लाहोर कलंदर्सने अंतिम सामन्यात मुल्लान सुल्तान्सवर 1 धावांनी विजय मिळवत यंदाच्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना लाहोरने 6 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुल्तानच्या संघाने देखील शानदार खेळी केली. मात्र, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील मुल्तानचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 199 धावा करू शकला. त्यामुळे लाहोरच्या संघाने 1 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा किताब उंचावला. 


 
PSL चे रेटिंग IPL पेक्षा जास्त होते - पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यावेळी पीएसएलची डिजिटल व्ह्यूअरशिप 150 दशलक्ष होती, तर आयपीएलची डिजिटल व्ह्यूअरशिप केवळ 130 दशलक्ष आहे आणि ही खूप मोठी बाब असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. "यावेळी गर्दीने विक्रम मोडले आणि तिकिटांच्या विक्रीनेही अनेक विक्रम मोडले. डिजिटलबद्दल भाष्य करायचे झाले तर, पीएसएलची स्पर्धा अर्ध्या टप्प्यात होती तेव्हा मी डिजिटल रेटिंगबद्दल विचारले. नजम सेठी शोला टीव्हीवर 0.5 रेटिंग मिळायचे तर पीएसएलला 11 हून अधिक रेटिंग मिळत आहे. त्यामुळे स्पर्धा पूर्ण होईपर्यंत रेटिंग 18 किंवा 20 असेल. 150 दशलक्षाहून अधिक लोकांनी ते डिजिटल पद्धतीने पाहिले. ही काही छोटी गोष्ट नाही. त्याच टप्प्यावर आयपीएलचे डिजिटल रेटिंग 130 दशलक्ष होते, तर पीएसएलचे रेटिंग 150 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. हे पाकिस्तानचे मोठे यश आहे", अशा शब्दांत सेठी यांनी PSL ची तुलना IPLशी केली.

खरं तर पाकिस्तान सुपर लीग आणि इंडियन प्रीमिअर लीगलमध्ये अनेकदा तुलना केली जाते. अनेक पाकिस्तानी क्रिकेट जाणकारांचा असा दावा आहे की, पीएसएलची गुणवत्ता आयपीएलपेक्षा चांगली आहे कारण येथे अनेक धोकादायक गोलंदाज आहेत, तर आयपीएलमध्ये गोलंदाजांचा वेग जास्त नाही. मात्र, लोकप्रियतेच्या बाबतीत आयपीएल जगभरात खूप प्रसिद्ध आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:  Pakistan Cricket Board President Najam Sethi has claimed that Pakistan Super League has overtaken IPL in terms of digital viewership 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.