Asia Cup 2023, Najam Sethi । नवी दिल्ली : आशिया चषक २०२३च्या (Asia Cup 2023) यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात मागील वर्षभरापासून वाद सुरू आहे. मात्र, आता पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी मवाळ भूमिका जाहीर करून बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. आगामी आशिया चषकाच्या स्पर्धेवर पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका बसेल असे सेठी यांनी सांगितले.
आर्थिक नुकसानासाठी तयार - सेठी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले, "जर आम्ही आशिया चषक खेळला नाही तर आम्हाला ३ मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास ८५.९५ कोटी (पाकिस्तानी रूपयानुसार) रूपयांचे नुकसान होईल. तसेच आम्ही जर विश्वचषक नाही खेळला किंवा त्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीसोबत आमचे संबंध बिघडतील. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याला खूप महत्त्व असते. जर असे नाही झाले तर अनेक मुद्दे समोर येतील.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर खूप अवलंबून होते. पण पाकिस्तान सुपर लीगमुळे यामध्ये खूप बदल झाला आहे. मला वाटते की, पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी आयसीसीवर अवलंबून असायचा. त्यामुळे आम्हाला त्यांच्या निर्णयाचे समर्थन करावे लागत असे. मात्र, आता पीएसएलमुळे पाकिस्तानची आर्थिक बाजू मजबूत झाली आहे. त्यामुळे सन्मासाठी आम्ही निर्णय घेतला आहे की, ३ मिलियन डॉलरचे नुकसान झाले तरी चालेल पण कोणत्याच स्पर्धेवर बहिष्कार टाकायचा नाही, असे सेठी यांनी अधिक सांगितले.
BCCI समोर PCB नतमस्तक
पाकिस्तानातील जिओ न्यूजशी बोलताना सेठी यांनी भारत-पाकिस्तान वादावर तोडगा टाकण्याचा प्रयत्न केला. "भारताने घेतलेल्या भूमिकेप्रमाणे आशिया चषक पाकिस्तानात होईल पण भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमीत कमी २ सामने खेळवले जातील. याच दोन सामन्यांमधून निम्म्याहून अधिक उत्पन्न मिळेल. पण तटस्थ ठिकाणी खेळवल्यास अधिक पैसे खर्च करावे लागतील. भारताची भूमिका आणि तटस्थ ठिकाणी खेळवायचे सामने याबाबतची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिली आहे", असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आणखी सांगितले.
भारत पाकिस्तानात आला नाही तर...
सेठी यांनी भारताबद्दल म्हटले, "जर भारत पाकिस्तानात नाही आला तर पाकिस्तानने देखील भारतात जाऊ नये अशी पाकिस्तानी चाहत्यांची भूमिका आहे. मला माहिती आहे की, भारत पाकिस्तानात नाही आला आणि आम्ही तिकडे गेलो तर आमचे चाहते नाराज होतील. लोकांनाही हे वाटते की आम्ही दबाव राखून ठेवायला हवा."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Pakistan Cricket Board President Najam Sethi has said that we are ready to play India's matches at neutral venues as there will be a loss of $3 million if Asia Cup 2023 is not played
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.