Join us  

पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार

World Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद हातातून निसटल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक देशांसह मिळून एक स्पर्धा आयोजन करण्याची तयारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 5:04 PM

Open in App

World Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद हातातून निसटल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक देशांसह मिळून एक स्पर्धा आयोजन करण्याची तयारी केली आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही तयारी आहे. बीसीसीआयने पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाठवण्यास नकार दिला, त्यानंतर श्रीलंका व बांगलादेश यांनीही PCB चा हायब्रिड मॉडेल फेटाळला. त्यामुळे आता ही स्पर्धा पाकिस्तानातून श्रीलंकेला होण्याची शक्यता आहे आणि या अपमानामुळे पाकिस्तान बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच आता पाकिस्तानने प्लान B म्हणून स्वतःच बहुदेशीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी दुबईला रवाना होण्यापूर्वी अधिकाऱ्यांना बहुदेशीय स्पर्धा आयोजनाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ३ किंवा ४ देशांचा समावेश असलेली स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करण्याचा PCBचा मानस आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक श्रीलंकेत खेळवला जावा, अशी इच्छा व्यक्त केलीय. नजम सेठीच्या दाव्यानुसार आशिया चषक पाकिस्तानएवजी संयुक्त अरब अमिराती येथे खेळवायला हवी. २०१८ व २०२२ ला आशिया चषक युएईत झाली होती. 

बीसीसीआय जर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल यूएईत घेऊ शकतात, तर मग आशिया चषक का नाही, असा सवाल सेठी यांनी उपस्थित केला.  दरम्यान, भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ असल्याची चर्चा आहे. त्याला आता PCB ने नकार दिलाय. आधी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा करणारे PCB आता भारतात वर्ल्ड कप खेळण्यास येणार आहेत, परंतु नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास ते तयार नसल्याचे वृत्त Dawn News ने दिले आहे. त्यांनी चेन्नई आणि बंगळुरू येथे पाकिस्तानचे सामने खेळवावेल अशी इच्छा व्यक्त केलीय.   

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानवन डे वर्ल्ड कप
Open in App