Big Breaking : पाकिस्तान संघाचे आणखी 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; शोएब मलिकचं काय झालं?

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:53 PM2020-06-23T18:53:02+5:302020-06-23T18:59:50+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Cricket Board on Tuesday confirmed that another 7 players have tested positive for Covid-19 | Big Breaking : पाकिस्तान संघाचे आणखी 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; शोएब मलिकचं काय झालं?

Big Breaking : पाकिस्तान संघाचे आणखी 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; शोएब मलिकचं काय झालं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी पाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले होते आणि आता त्यात आणखी सात खेळाडूंची भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याला या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्नी सानिया मिर्झाला भेटण्याची मूभा दिली गेली आहे. त्यामुळे त्याचा कोरोना अहवाल काय येतो याची सर्वांना उत्सुकता होती. पण, त्याचा अहवाल अजून समोर आलेला नाही. पाकिस्तानच्या 10 खेळाडूंसह एकूण 35 ( सपोर्ट स्टाफ) सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) मंगळवारी तसे जाहीर केले.

Breaking : 'अव्वल नंबरी' टेनिसपटूला कोरोना, 'तो' इव्हेन्ट महागात पडला!

पॉझिटिव्ह आढळलेले खेळाडू - फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ
 


नेगेटिव्ह आढळलेले खेळाडू - अबीद अली, असद शफीक, अझर अली, बाबर आझम, फहीम अश्रफ, फवाद आलम, इफ्तिकार अहमद, इमाम-उल-हक, खुशदील शाह, मोहम्मद अब्बास, नसीम शाह, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहैल खान आणि यासीर शाह 

मालिकेचे वेळापत्रक
कसोटी
5-9 ऑगस्ट - ओल्ड ट्रॅफर्ड
13-17 ऑगस्ट - साऊदम्प्टन
21-25 ऑगस्ट - साऊदम्प्टन. 
ट्वेंटी-20
29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शिखर धवनच्या मुलाला चाहत्यानं म्हटलं 'Black'; पत्नी आयशानं दिलं सडेतोड उत्तर

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली 13 वर्ष; पहिली सहा वर्ष ठरला फ्लॉप, पण आज थरथर कापतात गोलंदाज!

'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन 

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी जग आतुर; शोएब मलिकचा दावा

कोरोनाची धास्ती; हेल्मेट घालून खेळाडू करतोय कसरत, पाहा PHOTO!

घरात आलेल्या पाहूण्यानं सर्वांची उडवली झोप; घ्यावी लागली रेस्क्यू टीमची मदत

हरभजन सिंगनं शेअर केला मजेशीर फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का खेळाडू?

Read in English

Web Title: Pakistan Cricket Board on Tuesday confirmed that another 7 players have tested positive for Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.