नवी दिल्ली : 2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. अशातच मंगळवारी बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या धरतीवर होणारा पुढील आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची आमची मागणी असेल. असे जय शाह यांनी म्हटले. खरं तर यापूर्वी 2008 साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. बीसीसीआयने जाहीर करताच पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू, पत्रकार सारेच खवळले आणि BCCIला धमकी देऊ लागलेत.
वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू - पीसीबीपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेला सदस्यत्व सोडण्याची धमकी देऊन BCCIवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. PCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तर थेट भारतात 2023मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीच दिली. Geo Newsने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांच्या घोषणेनंतर PCBच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली. त्यात BCCIच्या निर्णयावर टीका केली गेली. 2012पासून दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही. 2008मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. ''PCB आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ICC आणि ACC यांनाही हे माहित्येय की पाकिस्तानने भारताता होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचेच नुकसान आहे,''असे PCBच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांचा जुना व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोलमडू शकते असे राजा या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. "भारतीय क्रिकेट बोर्ड आयसीसीला 90 टक्के फंडिंग देत असते. त्यामुळे उद्या जर भारताच्या पंतप्रधानांनी म्हटले की हे फंडिंग द्यायचे नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यामुळे कोलमडू शकते", असे रमीझ राजा म्हणत आहेत. त्यांचा हा जुना व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.
2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा - आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका- आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका- आशिया चषक 2023, पाकिस्तान- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"