पाकिस्तानचा बाबर आझम फसला! श्रीलंकेने आधी केला अपमान, मग मागितली माफी

नेटकऱ्यांनी का उडवली बाबर आझमची खिल्ली... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:21 PM2023-07-21T14:21:31+5:302023-07-21T14:22:53+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Cricket Captain Babar Azam trolled by Sri Lanka as price money amount on cheque was different social media viral photo | पाकिस्तानचा बाबर आझम फसला! श्रीलंकेने आधी केला अपमान, मग मागितली माफी

पाकिस्तानचा बाबर आझम फसला! श्रीलंकेने आधी केला अपमान, मग मागितली माफी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Babar Azam Trolled, Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार बाबर आझम याची श्रीलंकेत चांगलीच खिल्ली उडाली. क्रिकेट बोर्डाने दिलेल्या धनादेशावर दोन वेगळ्या रकमा लिहून ठेवल्याचे आढळून आल्यानंतर साऱ्यांनीच त्याला ट्रोल केले. तो स्वत:देखील या घटनेवर खळखळून हसला. पण सोशल मीडियावर मात्र लोकांनी मीम्स बनवून हा प्रकार खूप एन्जॉय केला. प्रकरणाची खूपच जास्त चर्चा रंगली त्यावेळी मात्र श्रीलंकन बोर्डाला आपल्याकडून चूक झाल्याबद्दल माफी मागावे लागले. एक निवेदन जारी करून त्यांनी बाबर आझम आणि पाकिस्तानची माफी मागितली, पण तोपर्यंत सोशल मीडियावर बाबर आझमची प्रचंड टिंगल-टवाळी करण्यात आली होती.

नक्की काय घडलं?

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दिमुथ करुणारत्नेच्या श्रीलंकेचा पराभव केला. विजेत्या संघाला पोस्ट मॅच प्रेंझेटशन मध्ये दिलेल्या धनादेशात श्रीलंकेने मोठी चूक केली. 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने श्रीलंकेवर 4 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावातील द्विशतक आणि दुसऱ्या डावातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सौद शकीलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

बाबर आझमची खिल्ली उडवली

मॅचनंतरच्या प्रेझेंटेशन सोहळ्यादरम्यान, बाबर आझम मॅच विनरचा चेक घेण्यासाठी आला आणि त्याने कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. काही वेळाने बाबरचा चेकसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी श्रीलंकन क्रिकेटची मोठी चूक पकडली. बाबर आझमला देण्यात आलेल्या धनादेशावर दोन वेगवेगळ्या रकमा छापण्यात आल्या होत्या. चेकमध्ये US$5,000 आकड्यांमध्ये होते, तर अक्षरात फक्त US$2,000 लिहिले होते. या व्हायरल फोटोसह बाबर आझमची खूपच खिल्ली उडवण्यात आली.

श्रीलंका क्रिकेटने मागितली माफी

श्रीलंका क्रिकेटने याबद्दल नंतर स्पष्टीकरण जारी केले आणि सांगितले की ती रक्कम US$5000 आहे. श्रीलंका क्रिकेट म्हणाले- श्रीलंका क्रिकेट (SLC) कळवू इच्छिते की श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील नुकत्याच संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजेत्याला बक्षीस रक्कम US$ 5000 आहे. सामन्यातील विजेत्याला देण्यात आलेल्या 'प्रेझेंटेशन चेक'मधील चुकीबद्दल माफी असावी. सामन्यानंतरचे सादरीकरण पुरस्कार श्रीलंकेच्या देशांतर्गत दौऱ्यांसाठी ग्राउंड राइट्स धारकाद्वारे तयार केले जातात, असे निवेदनात पुढे म्हटले. ही जबाबदारी आयटीडब्ल्यू कन्सल्टिंगची आहे. तरीही, श्रीलंका क्रिकेट त्याची संपूर्ण जबाबदारी घेते.

Web Title: Pakistan Cricket Captain Babar Azam trolled by Sri Lanka as price money amount on cheque was different social media viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.