पाकिस्तान क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज बाबर आझमने नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याच्या आधी शनिवारी निवडकर्ता मोहम्मद युसुफने वैयक्तिक कारणाचा दाखला देत आपले पद सोडले. आता उस्मान कादिरने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे ही एक अभिमानाची बाब असून, संघातील सहकारी आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या पाठिंबा यामुळे मी त्यांचा ऋणी आहे, असे कादिरने नमूद केले.
सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने निवृत्त होत असल्याची माहिती दिली. उस्मान कादिर म्हणाला की, कधीही न विसरता येणारे विजयाचे क्षण, सर्वांनी मिळून आव्हानांचा केलेला सामना आणि माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. पाकिस्तानमधील चाहते नेहमीच माझ्या पाठिशी राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. आता नवीन कारकीर्द सुरू होत आहे, इथे मी माझ्या वडिलांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करेन. सर्वांचे खूप खूप आभार.
दरम्यान, पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची घोषणा झाली आहे. वन डे विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक ७-११ ऑक्टोबर, मुल्तान१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी