Join us  

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!

babar azam captaincy news : बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 12:25 PM

Open in App

babar azam latest news पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमी काही ना काही लक्षवेधी घडामोडी घडत असतात. अलीकडेच निवडकर्ता मोहम्मद युसूफने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने व्हाइट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित बाबरने ही माहिती दिली. मला चाहत्यांसोबत एक बातमी शेअर करायची आहे. मी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा झाली आहे, असे बाबर आझमने नमूद केले. 

पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करणे ही अभिमानाची बाब आहे. पण, मी आता कर्णधारपदातून मुक्त होऊन स्वत:च्या खेळीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देईन. वर्कलोड पाहता मला माझ्या खेळीकडे, फलंदाजीकडे आणि कुटुंबीयांकडे लक्ष देण्याची गरज वाटते. मी कर्णधार म्हणून जे प्राप्त केले त्याचा आनंद असून, सर्वांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानू इच्छितो, असेही बाबर आझमने सांगितले. दरम्यान, पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची घोषणा झाली आहे. वन डे विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. आता बाबरच्या राजीनाम्यामुळे मोहम्मद रिझवान कर्णधार बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.

PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक ७-११ ऑक्टोबर, मुल्तान१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तान