Pakistani Cricketer on Virat Kohli Captaincy: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने टी२० आणि वन डे पाठोपाठ शनिवारी कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १-० अशी आघाडी घेतल्यानंतर २-१ने भारताचा पराभूत व्हावे लागले. त्यानंतर विराटने अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय क्रिकेटविश्वाला हादरवणारा होता. गेल्या काही दिवसात विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात होतं. त्यातच विराटच्या अशा निर्णयामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं. पण असं असलं तरी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने विराट कोहलीची स्तुती करत, तूच माझ्यासाठी खरा कर्णधार आहे, असं मत व्यक्त केलं.
विराट कोहली हा त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीतही काही विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर काहींनी त्या या आक्रमक वर्तणुकीवर टीका केली, पण विराटचा आक्रमकपणा काही खेळाडूंना मात्र नेहमीच भावला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर एक ट्विट करत तू माझ्यासाठी खरा लीडर आहेस अशी भावना व्यक्त केली. 'विराट भाई तू माझ्यासाठी खरा लीडर आहेस. माझ्या मते येणाऱ्या पिढीतील क्रिकेटपटूंसाठी तूच खरा कर्णधार आणि नेता आहेस. कारण युवा क्रिकेटर्ससाी तू प्रेरणास्थान आहेस. मैदानात आणि मैदानाबाहेरही दमदार कामगिरी करत राहा', असं ट्वीट आमीरने केलं.
--
--
--
पाकिस्तानच्या इतर क्रिकेटपटूंनीही विराट कोहलीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तू अनेकांना प्रेरणा देणारा स्रोत आहेस असं नसीम शाह म्हणाला. क्रिकेटबद्दल तुझ्यात असलेली तळमळ कायम तुझ्या नेतृत्वात दिसून आली. सात वर्षे आम्ही तुझ्याकडून निर्भिड नेतृत्व आणि खिलाडीवृत्ती शिकलो, असं अहमद शहजादने लिहिलं.