Pakistan Cricket Trolled, ENG vs PAK Test: इंग्लंडने पाकिस्तानचा त्यांच्याच भूमीवर लाजिरवाणा पराभव केला. पाकिस्तानमधील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणारा इंग्लंड (England Cricket Team) हा जगातील पहिला संघ ठरला. बाबर आझमच्या टीमला अशी दयनीय हार मिळाल्याचे पाहून पाकिस्तान फॅन्स वगळता इतर सारेच एन्जॉय करत आहेत. त्यातच आता आईसलँड क्रिकेटला पाकिस्तानच्या या अवस्थेबद्दल दया आली पण त्यासोबत त्यांनी पाकिस्तानची खिल्लीही उडवली. आईसलँड क्रिकेटने (Iceland cricket) पाकिस्तानला एक भन्नाट ऑफर दिली आणि त्यांची चांगलीच टिंगल केली.
इंग्लंड संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आणि तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचा पराभव केला. मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकली. त्यानंतर जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. आइसलँड क्रिकेटही या बाबतीत मागे नाही. आइसलँड क्रिकेट बोर्डाने ट्विट केले- "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आमचा निरोप आहे की आम्ही पाकिस्तानात कसोटी मालिका खेळायला येण्यास आनंदाने तयार आहोत. इतकेच नाही तर आम्ही आमचा ३-० असा पराभव करून घेण्यासही तयार आहोत. आम्हाला अतिशय वाईट रीतीने हरवले तरीही चालेल. आम्ही तुम्हाला हमी देतो की आम्ही ७च्या रनरेट ने धावा न करता ०.७च्या रनरेटने धावा करू."
--
याआधी, आइसलँड क्रिकेटने पाकिस्तान हे पर्यटनासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे आणि पर्यटनासाठी त्याचे कौतुक केले जात नाही, अशी खिल्ली उडवली होती. परंतु असे दिसते की ब्रिटिशांनी कराचीसाठी आधीच फ्लाइट बूक केली आहे, असेही म्हणाले होते. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ७४ धावांनी, दुसऱ्या कसोटीत २६ धावांनी आणि तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. हॅरी ब्रूक्स इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक होता. त्याने सलग तीन शतकांसह एकूण ४६८ धावा केल्या.
Web Title: Pakistan Cricket team brutally trolled by Iceland cricket after shameless loss in ENG vs PAK Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.