Join us  

Pakistan Cricket Trolled, ENG vs PAK Test: इमोशनल डॅमेज.. पाकिस्तानच्या पराभवानंतर आईसलँड क्रिकेटने ट्विट करत केलं ट्रोल

पाकिस्तानचा इंग्लंडने त्यांच्याच भूमीवर ३-० असा पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 5:30 PM

Open in App

Pakistan Cricket Trolled, ENG vs PAK Test: इंग्लंडने पाकिस्तानचा त्यांच्याच भूमीवर लाजिरवाणा पराभव केला. पाकिस्तानमधील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणारा इंग्लंड (England Cricket Team) हा जगातील पहिला संघ ठरला. बाबर आझमच्या टीमला अशी दयनीय हार मिळाल्याचे पाहून पाकिस्तान फॅन्स वगळता इतर सारेच एन्जॉय करत आहेत. त्यातच आता आईसलँड क्रिकेटला पाकिस्तानच्या या अवस्थेबद्दल दया आली पण त्यासोबत त्यांनी पाकिस्तानची खिल्लीही उडवली. आईसलँड क्रिकेटने (Iceland cricket) पाकिस्तानला एक भन्नाट ऑफर दिली आणि त्यांची चांगलीच टिंगल केली.

इंग्लंड संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आणि तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचा पराभव केला. मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकली. त्यानंतर जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. आइसलँड क्रिकेटही या बाबतीत मागे नाही. आइसलँड क्रिकेट बोर्डाने ट्विट केले- "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आमचा निरोप आहे की आम्ही पाकिस्तानात कसोटी मालिका खेळायला येण्यास आनंदाने तयार आहोत. इतकेच नाही तर आम्ही आमचा ३-० असा पराभव करून घेण्यासही तयार आहोत. आम्हाला अतिशय वाईट रीतीने हरवले तरीही चालेल. आम्ही तुम्हाला हमी देतो की आम्ही ७च्या रनरेट ने धावा न करता ०.७च्या रनरेटने धावा करू."

--

याआधी, आइसलँड क्रिकेटने पाकिस्तान हे पर्यटनासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे आणि पर्यटनासाठी त्याचे कौतुक केले जात नाही, अशी खिल्ली उडवली होती. परंतु असे दिसते की ब्रिटिशांनी कराचीसाठी आधीच फ्लाइट बूक केली आहे, असेही म्हणाले होते. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ७४ धावांनी, दुसऱ्या कसोटीत २६ धावांनी आणि तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभव केला. हॅरी ब्रूक्स इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक होता. त्याने सलग तीन शतकांसह एकूण ४६८ धावा केल्या.

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमइंग्लंडट्रोलसोशल व्हायरल
Open in App