Join us  

पाकिस्तानचा निम्मा संघ बेक्कार अडकणार, एक चूक महागात पडणार! ICC कारवाईसाठी सज्ज

ICC ODI World Cup 2023 Pakistan Cricket : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळायला भारतात आलेला पाकिस्तानचा क्रिकेट संघ सतत कुठल्या ना कुठल्या वादात अडकतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 2:42 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 Pakistan Cricket : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळायला भारतात आलेला पाकिस्तानचा क्रिकेट संघ सतत कुठल्या ना कुठल्या वादात अडकतोय... मोहम्मद रिझवानने नुकतेच गाझा साठी ट्विट केलं होतं आणि त्याने मैदानावर नमाज अदा केल्याने त्याच्याविरोधात वकिलाने तक्रार दाखल केली आहे. असे असताना आता पाकिस्तानचा निम्मा संघ अडचणीत सापडणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ उद्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. 

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या हल्ल्यात हजारो लोक मारले गेले आहेत. या युद्धावर अनेक क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मोहम्मद रिझवानने आपला विजय आणि शतक गाझावासीयांना समर्पित केले होते. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ तो समोर आला होता. यावरून त्याला ट्रोलही करण्यात आले होते. आता रिझवानसह पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे.

या यादीत मोहम्मद नवाज, ओसामा मीर, शादाब खान आणि हरिस रौफसारखे खेळाडू आहेत. सर्व खेळाडूंनी त्यांच्या ट्विटरवर पॅलेस्टाईन ध्वजाचा फोटो पोस्ट केला. जेव्हा मोहम्मद रिझवानने पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी लोक त्याच्यावर खूप चिडले होते. चाहत्यांनी आयसीसीकडे रिझवानवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सर्व खेळाडूंवर आयसीसी कारवाई करते की नाही हे पाहणे बाकी आहे.

काय म्हणालेला मोहम्मद रिझवान?श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर रिझवानने त्याच्या ट्विटरवर लिहिले होते की, “आम्ही या विजयाचे श्रेय गाझातील आमच्या बंधू-भगिनींना देऊ इच्छितो. विजयात योगदान देताना मला खूप आनंद होत आहे. याचे श्रेयही संपूर्ण टीमला जाते. विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अली ज्यांनी विजय अगदी सोपा केला. हैदराबादच्या लोकांचे इतके प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आहे.

विश्वचषकासाठी पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, सौद शकील, एम नवाज, शाहीन. शाह आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली, उसामा मीर आणि वसीम जूनियर.

राखीव: अबरार अहमद, मोहम्मद हारिस आणि जमान खान

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपऑफ द फिल्डपाकिस्तानइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष