पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघासोबत १७ सदस्यांचे संघ व्यवस्थापन जाहीर केले आहे. १४ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पीसीबीने आधीच उमर गुल व सईद अजमल यांची अनुक्रमे जलदगती गोलंदाज व फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याशिवाय पीसीबीने अन्य सपोर्ट स्टाफ जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांची नावे जाहीर केली.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अॅडम हॉलिओक यांची फलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे, तर सायमन ग्रँट हेल्मोट हे या दौऱ्यावर संघाचे हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक असतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ व्यवस्थापनाची नावे जाहीर केल्यानंतर नेटिझन्सला धक्का बसला. खेळाडूं इतकी संख्या होण्यासाठी १ सदस्य कमी पडला, असे एकाने लिहिले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मुख्य प्रशिक्षक ग्रँट ब्रॅडबर्न, संघ व्यवस्थापक मिकी ऑर्थर आणि फलंदाज प्रशिक्षक अँड्य्रू पुटीक यांची वर्ल्ड कपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हकालपट्टी केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यांनी गोलंदाज प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
पाकिस्तानचा १८ सदस्यीय संघ - शान मसूद ( कर्णधार), आमीर जमाल, अब्दुल्लाह शफीक, अब्रार अहमद, बाबर आजम, फहीम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मिर हम्झा, मोहम्मद रिझवान ( यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्यु., नोमन अली, सईम आयुब, सलमान अली आघा, सर्फराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी ( Pakistan squad for Australia Tests: Shan Masood (captain), Aamir Jamal, Abdullah Shafique, Abrar Ahmed, Babar Azam, Faheem Ashraf, Hasan Ali, Imam-ul-Haq, Khurram Shahzad, Mir Hamza, Mohammad Rizwan (wk), Mohammad Wasim Jnr, Noman Ali, Saim Ayub, Salman Ali Agha, Sarfaraz Ahmed (wk), Saud Shakeel and Shaheen Shah Afridi.)