Join us  

"आमच्याकडे अद्याप चॅम्पियन संघ नाही...", पाकिस्तानी प्रशिक्षकाने दिली प्रामाणिक कबुली

grant bradburn coach : पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 5:48 PM

Open in App

pak vs nz t20 series । नवी दिल्ली : अलीकडेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-२० मालिका पार पडली. काल झालेला अखेरचा सामना जिंकून पाहुण्या न्यूझीलंडने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० ने आघाडी घेतली होती. तर तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. अखेरचे दोन्ही सामने जिंकून किवी संघाने २-२ अशी मालिकेत बरोबरी साधली आणि पाकिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा केला. मालिका बरोबरीत संपल्यानंतर पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक ग्रँट ब्रॅडबर्न यांनी एक मोठे विधान केले आहे.

पाकिस्तानी संघात चॅम्पियन खेळाडूंचा साठा आहे, पण अद्याप चॅम्पियन संघ नाही, असे पाकिस्तानी प्रशिक्षकांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ब्रॅडबर्न यांनी म्हटले, "आम्ही आमच्या खेळाडूंना समजू किंवा समजावू शकलो नाही. अद्याप आपला संघ तिथे नाही जिथे आपल्याला व्हायला हवे होते. जर आपल्याला विश्वचषकात टक्कर द्यायची असेल तर सामने जिंकायला हवेत. त्यासाठी आम्हाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर जायचे आहे. आमच्या खेळाडूंना सुधारणा करावी लागणार आहे." 

अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजयकाल झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १९३ धावा केल्या. सलामीवीर मोहम्मद रिझवानने ६२ चेंडूत ९८ धावांची शानदार खेळी केली. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाची सुरूवात निराशाजनक झाली. कर्णधार टॉम लॅथम (०), चाड बोवेस (१९), डेरी मिचेल (१५) विल यंग (४) स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर मार्क चॅपमन शो सुरू झाला आणि त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला. जिमी नीशमने २५ चेंडूत ४५ धावा करून चॅपमॅनला साथ दिली. लक्षणीय बाब म्हणजे मार्क चॅपमनने ५७ चेंडूत १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या संघाने १९.२ षटकांत १९४ धावा करून विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. ट्वेंटी-२० मालिकेनंतर २६ एप्रिलपासून दोन्ही संघांमध्ये वन डे मालिका खेळवली जाणार आहे. 

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका 

  1. २६ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
  2. ३० एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
  3. ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
  4. ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
  5. ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडबाबर आजमट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App