ICC ODI World Cup 2023 - भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, काही समस्यांमुळे India vs Pakistan लढतीसह अन्य काही सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता बळावली आहे. भारत-पाकिस्तान हा सामना दोन्ही खेळाडूंसाठी मानसिक दडपण आणणारा सामना असतो आणि भारतात येण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) अनेक नखरे केले आहेत. त्यांना अहमदाबाद येथे खेळायचे नव्हते, चेन्नईचा सामना बंगळुरूत आणि बंगळुरूचा सामना चेन्नईत हवा होता. पण, ICC व BCCI ने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आता PCB कडे पाकिस्तानी खेळाडूंनी मानसिक आधार मिळावा यासाठी मानसशास्त्रज्ञ ( psychologist) मागितला आहे.
वर्ल्ड कप वेळापत्रकात आणखी बदल? पाकिस्तानच्या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास पोलिसांचा नकार!
पाकिस्तान क्रिकेट संघाला मानसशास्त्रज्ञाची नितांत गरज आहे. बाबर आझम आणि कंपनी वर्ल्ड कप २०२३ मध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर IND विरुद्ध PAK सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे संघ दबाव हाताळू शकेल, यासाठी PCB क्रीडा मानसशास्त्रज्ञ शोधत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कप २०२३ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २ सप्टेंबर रोजी होण्याचा अंदाज आहे. कर्णधार बाबर आजमसह बहुतेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात एकही सामना खेळलेला नाही. येथील प्रचंड दबावाबाबत संघ अनभिज्ञ असेल.
पाकिस्तानने यापूर्वीच दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध हाय व्होल्टेज सामने गमावले असल्याने, PCB चेअरमन झाका अश्रफ यांना संघासोबत मानसशास्त्रज्ञ किंवा मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक हवा आहे. सामन्याच्या ठिकाणावर तसेच स्थळावर मीडियाचे मोठे लक्ष असेल. २०१२ मध्ये जेव्हा पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ( ३ ODI आणि ५ T20I) भारताला भेट दिली होती, तेव्हा PCB ने संघासह क्रीडा मानसशास्त्रज्ञ पाठवले होते. झाका अश्रफ हे त्यावेळीही पीसीबीचे अध्यक्ष होते.
पाकिस्तान क्रिकेट संघाला निराशाजनक पराभवातून पुनरागमन करायचे असल्याने क्रीडा मानसशास्त्रज्ञ खूप मदत करेल. जिओ न्यूजनुसार मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांच्याकडे ही जबाबादारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी लाहोर कलंदर्समध्ये पाकिस्तानी खेळाडूंसोबत काम केले आहे. भारताने २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी पॅडी अप्टनची नियुक्ती केली होती. २०११ च्या विश्वचषक विजेत्या मोहिमेसाठी अप्टन भारतीय सपोर्ट स्टाफचा भाग होते.