Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती

Pakistan Cricketer Fails Viral Video: सैम अयुबने नो-लूक शॉट म्हणजे न बघता षटकार मारला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 08:13 PM2024-09-15T20:13:22+5:302024-09-15T20:21:38+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Cricketer Saim Ayub faced huge humiliation after got out by playing no look shot | Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती

Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan Cricketer Fails Viral Video: पाकिस्तानमध्ये सध्या चॅम्पियन्स वनडे कप टूर्नामेंट खेळली जात आहे. या देशांतर्गत स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व स्टार खेळाडू खेळत आहेत. स्पर्धेत एकूण ५ संघ आहेत. ही ५० षटकांची स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात होणार आहे. त्यामध्ये अंतिम फेरीसह एकूण १४ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानचा युवा फलंदाज सैम अयुबची चांगलीच लाज निघाली. स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात तो एक फटका मारण्यात फसला आणि त्याचं चांगलंच हसं झालं.

पाकिस्तानी खेळाडूचा झाला अपमान

फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत पँथर्सकडून खेळणारा सैम अयुब पूर्णपणे फ्लॉप ठरला. डॉल्फिनविरुद्ध नो-लूक शॉट खेळताना त्याला विचित्रपणे बाद व्हावे लागले. सैम अयुबने नो-लूक शॉट म्हणजे न बघता षटकार मारला. अनेकवेळा त्याने हा शॉट नीट खेळला आहे. पण यावेळी त्याने मारलेला फटका चुकला आणि तो बाद झाला. पाहा व्हिडीओ-

पँथर्सच्या डावातील तिसऱ्या षटकात अयुबने त्याचा ट्रेडमार्क नो-लूक शॉट मीर हमजाविरुद्ध मारला. पण यावेळी चेंडू बॅटच्या एजवर लागला आणि मिड-ऑफवर थेट मोहम्मद हुरैराकडे गेला, त्यामुळे तो बाद झाला. तो बाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

Web Title: Pakistan Cricketer Saim Ayub faced huge humiliation after got out by playing no look shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.