Join us  

पाकिस्तानी खेळाडूचं 'लफडं' सोशल मीडियावर व्हायरल; दुबईतील मुलीचे गंभीर आरोप

पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि अफेअर्स ही प्रकरणं काही नवीन नाहीत. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 2:31 PM

Open in App

पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि अफेअर्स ही प्रकरणं काही नवीन नाहीत. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. दुबईतील एका मुलीनं पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शादाब खानवर गंभीर आरोप केले आहेत. दुबईची अशरीना साफिया असं या मुलीचं नाव असून तिनं सोशल मीडियावर शादाबवर आरोप केले आहेत. शादाबनं आपल्याला फसवल्याचा आरोप अशरीनानं केले आहेत. अशरीनानं या दोघांमधील काही चॅट्स आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. 

याआधी पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याच्यावरही असेच आरोप झाले होते. इमामने अनेक मुलींसोबत केलेली चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात अनेकींनी इमामवर फसवल्याचा आरोप केला होता. आता शादाबही असाच एका प्रकरणात अडकला आहे. दुबईत राहणाऱ्या अशरीनानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टेटमेंट जाहीर केले. त्यात तिनं शादाबनं कशी तिच्यासोबत मैत्री केली आणि त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर करून कसा गैरफायदा घेतला हेही सांगितलं आहे. 

शादाबनं पाकिस्तान संघाकडून 5 कसोटी, 43 वन डे आणि 40 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसताच शादाबनं त्या मुलीला तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या दोघांमधील संबंध जगजाहीर केल्यास शादाब माझे न्यूड फोटो व्हायरल करेल, असं त्या मुलीचं म्हणणं आहे. अशरीनानं लिहीलं की,''शादाबशी माझी मैत्री मार्च 2019मध्ये झाली. लंडन येथे झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आम्ही खूपच जवळ आलो होतो. त्याची सोबत मिळावी म्हणून विविध देशांत प्रवास करण्यासाठी जवळपास 15000 डॉलर खर्च केले. मला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता. पण, पाकिस्तानच्या एका पत्रकारानं आमच्या संबंधावर बातमी केल्यानंतर शादाबनं मला धमकी दिली. त्यानं आमचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.'' 

टॅग्स :पाकिस्तानदुबईगुन्हेगारी