Join us  

'तो' क्रिकेटपटू हिंदू होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर अन्याय केला; शोएब अख्तरचा मोठा गौप्यस्फोट...

युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 5:50 PM

Open in App
ठळक मुद्देत्या हिंदू खेळाडूला मारण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती.

मुंबई : खेळाडूची गुणवत्ता पाहायची असते की जात, हा प्रश्न सध्याच्या घडीला ऐरणीवर आला आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका नेत्याने क्रीडा संघांतही आरक्षण असावे, अशी भूमिका मांडली होती. आता तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शोएब अख्तरने एका मोठा गौप्यस्फोट केला आहे.

 

सध्याच्या घडीला भारतामध्ये नागरीकत्वाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जर अन्य देशांतील भारतीय लोकांवर अन्याय केला जात असेल, तर काय करायचे याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काही लोकांना तर आपले भारतातील नागरीकत्व रद्द करणार, असे वाटत आहे.

भारतामध्ये जसे मुस्लीम धर्माचे लोकं राहतात तसेच पाकिस्तानमध्ये काही हिंदूदेखील राहत आहेत. पण पाकिस्तानमधील हिंदू लोकांवर कायम अन्याय केला जातो, असे म्हटले जाते. आता तर पाकिस्तानच्या क्रिकेट संघातही हिंदू खेळाडूंवर अन्याय केला गेल्याचा मोठा गौप्यस्पोट अख्तरने केला आहे.

अख्तरने  'गेम ऑन है' या टीव्ही शो मध्ये ही गोष्ट सांगितली. यावेळी पाकिस्तानचे काही माजी क्रिकेटपटूही कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अख्तर म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात बरेच हेवेदावे केले जातात. पाकिस्तानच्या संघात गुणवत्ता आणि कामगिरी या गोष्टींपेक्षाही काही गोष्टी महत्वाचा ठरतात. या गोष्टींसाठी पाकिस्तानचे खेळाडू हाणामारी करायलाही तयार असतात." 

अख्तर पुढे म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात जे खेळाडू मुस्लीम होते, त्यांच्यावर अन्याय केला गेला. युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. तो देवाची देणगीच होता. पण ही देणगी पाकिस्तानच्या संघाला चांगल्यापद्धतीने सांभाळता आली नाही. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला." 

हिंदू क्रिकेटपटूबाबत अख्तर म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात हिंदू खेळाडूही होता. तो हिंदू आहे म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघाल बऱ्याच विकेट्स मिळवून दिल्या. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या, पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंची आग मस्तकात जायची. त्या हिंदू खेळाडूला मारण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूची कारकिर्द अल्पावधीतच आटोपली, नाहीतर त्याने जास्त काळ संघाची सेवा केली असती. हा हिंदू खेळाडू होता दानिश कनेरिया."

टॅग्स :शोएब अख्तरभारतपाकिस्तान