श्रीलंकन संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये जवळपास 10 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन झालं नव्हतं. गतवर्षी श्रीलंका आणि बांगलादेश संघांनी पाक दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धा आयोजनाचं स्वप्न पाहत आहे. पीसीबीचे चेअरमध एहसान मनी यांनी संयुक्त अरब अमिराती ( यूएई) सह आयसीसीच्या सहा पैकी पाच प्रमुख स्पर्धांच्या आयोजनासाठी बोली लावणार असल्याचे सांगितले.
2023-2031 या कालावधीत होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांसाठी पीसीबी दावा सांगणार आहे. यापैकी कमीत कमी दोन स्पर्धा वाट्याला येतील, असा त्यांना विश्वास आहे. मनी यांनी सांगितले की,''आम्ही सहापैकी पाच स्पर्धांच्या आयोजनाची इच्छा आहे. किमान दोन स्पर्धा आयोजनाचा मान मिळेल, असा विश्वास आहे. यासाठी आम्ही संयुक्त अरब अमिरातीसह चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही दोघंही मिळून बोली लावणार आहोत.''
IPL साठी आशिया कपचा बळी देणार नाहीकोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचं ( आयपीएल 2020) 13 वं मोसम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआय आशिया चषक आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखांवर नजर ठेवून आहे. कोरोनामुळे याही स्पर्धा रद्द होऊ शकतात. तसे झाल्यात बीसीसीआय त्या तारखांना आयपीएल खेळवेल. तसे न झाल्यास आशिया चषक पुढे ढकलून आयपीएल खेळवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. एहसान मनी यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले,''आशिया चषक हा केवळ भारत-पाकिस्तानचा नाही. त्यामुळे आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी
Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...
EXPENSIVE: हार्दिक पांड्याच्या शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर; इतक्या रुपयात येतील 30-40 ब्रांडेड शर्ट