Saeed Anwar on Babar Azam exclusion from Pakistan Test Team, PAK vs ENG: बांगलादेशी संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-० ने कसोटी मालिकेत धूळ चारली. या पराभवातून पाकिस्तानचा संघ सावरलेला नव्हता, तोच इंग्लंडने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत अतिशय वाईट पद्धतीने पराभूत केले. पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ८०० पार धावसंख्या नेली आणि पाकिस्तानला दुसऱ्या डावात स्वस्तात बाद करून कसोटी एका डावाने जिंकली. पाकिस्तानचा हा पराभव जिव्हारी लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी निवडसमितीने मोठा निर्णय घेतला. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान फलंदाजांशी तुलना केली जाणार फलंदाज बाबर आझमला पाकिस्तानच्या संघातून बाहेर ठेवण्यात आले. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींसह जगभरात साऱ्यांनाच या निर्णयाचे आश्चर्य वाटले. यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर याने बाबरला सूचक संदेश दिला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या सततच्या अपयशानंतर एक मोठा निर्णय घेतला. स्टार बॅटर बाबर आझम याला संघातून डच्चू देण्यात आला. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानी सिलेक्टर्सने संघाची आधीच घोषणा केली. त्यात बाबर आझमसह शाहिन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांचाही पत्ता कट करण्यात आला. बाबर आझमची आधी कॅप्टन्सी गेली आणि आता त्याच्यावर संघाबाहेर बसण्याची नामुष्की ओढवली. या निर्णयानंतर सईद अन्वर म्हणाला, "बाबर बेटा, तू खचू नकोस. मनाने कणखर राहा. ही वेळ देखील लवकरच जाईल आणि चांगली वेळ येईल. प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीत असा वाईट काळ येतो, पण मला खात्री आहे की तू लवकरच दणक्यात पुनरागमन करशील."
दरम्यान, गेल्या काही क्रिकेट मालिकांपासून बाबर आझम प्रत्येक धावेसाठी सातत्याने संघर्ष करताना दिसला. मागील ९ कसोटी सामन्यात बाबरला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातदेखील तो अपयशी ठरला होता. आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील मुल्तान कसोटीत इतर फलंदाजांनी भल्यामोठ्या धावसंख्या उभारल्या. पण बाबरला साधे अर्धशतकही गाठता आले नाही. त्यामुळे पाकिस्तान संघनिवड समितीने कठोर निर्णय घेत बाबरलवा संघातून वगळले आहे. बाबर वगळण्याचा निर्णय पाकिस्तानी संघासाठी कितपत योग्य ठरतो, हे तर वेळच ठरवेल.
Web Title: Pakistan excludes Babar Azam from reminder of PAK vs ENG Test Series Saeed Anwar special message This too shall pass Stay strong
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.