Join us  

Mohammad Hasnain : पाकिस्तानचा आणखी एक 'फेकी' बॉलर; BBLमधील तक्रारीनंतर गोलंदाजावर घातली गेली बंदी, PCB म्हणते...

पाकिस्तानचा भविष्याचा स्टार म्हणून या गोलंदाजाचा खूप गाजावाजा झाला. बिग बॅश लीगमध्ये त्याने पदार्पणातच पराक्रम केला, परंतु त्याच्या गोलंदाजीबाबत अनेकांनी तक्रार केली आणि अखेर....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 12:08 PM

Open in App

पाकिस्तनचा जलदगती गोलंदाज मोहम्मद हसनैन ( Mohammed Hasnain) याच्या गोलंदाजीवर बंदी घातली गेली आहे. लाहौर येथे झालेल्या बायमेक्निकल टेस्टध्ये त्याची गोलंदाजीची शैली अवैध सापडली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ( Cricket Australia) याबाबतची माहिती दिली. मागील महिन्यात हसनैन याने सिडनी थंडर्सकडून ( Sydney Thunder) बिग बॅश लीगमध्ये पदार्पम केले होते. तेव्हाच त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. २१ जानेवारीला लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स येथे त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली. हसनैन जेव्हा गुड लेंथ, फुल लेंथ, बाऊन्सर किंवा स्लो बाऊन्सर फेकतो तेव्हा त्याचा हाताचा कोपरा आयसीसीच्या १५ डिग्री नियमांचे उल्लंघन करतो. हसनैन सातत्यानं १४५ Km च्या वेगाने चेंडू फेकतो.

त्याच्यावरील बंदीचा अर्थ असा की या २१ वर्षीय गोलंदाजाला पुढील महिन्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळता येणार नाही. शिवाय त्याला आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळता येणार नाही. त्याला आता गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा करावी लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) हसनैनच्या शैलीत सुधारणा करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच्यासाठी प्रशिक्षक नियुक्त केला जाणार आहे. पीसीबीने लिहिले की,''पीसीबी तज्ञांसोबत चर्चा करून हसनैनच्या गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पीसीबी गोलंदाजी सल्लागार नियुक्त करणार आहे आणि तो हसनैनसोबत काम करणार आहे.''

२ जानेवारीला हसनैनच्या गोलंदाजीबाबत तक्रार दाखल करण्यात आली. त्याने आतापर्यंत १८ आंतरराष्ट्रीय  ट्वेंटी-२० सामन्यांसह ७० सामने खेळले आहेत. त्याने ८ वन डे सामनेही खेळले आहेत. बीबीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने एडिलेड स्ट्रायकर्सच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. हसनैनवर कधीपर्यंत बंदी असेल याची स्पष्टता झालेला नाही. आयसीसीच्या नियमानुसार त्याची शैली योग्य ठरताच तो गोलंदाजी करू शकतो.   

टॅग्स :पाकिस्तानबिग बॅश लीगआयसीसी
Open in App