Join us

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल, अंतिम 15 शिलेदार जाहीर

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप चमूत दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:23 IST

Open in App

लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप चमूत दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी सोमवारी पाकिस्तानचा 15 जणांचा अंतिम संघ जाहीर केला. पाकिस्तानने याआधी जाहीर केलेल्या संघातून जुनैद खान व फहीम अशरफ यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे.

''इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत आमच्या गोलंदाजांना सपशेल अपयश आले. त्यामुळे वर्ल्ड कप संघात आमीर व रियाज या अनुभवी शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यांना न घेऊन आम्ही फार मोठी चूक केली असती,''अशी कबुली इंजमाम उल हकने दिली.  पाकिस्तानचा संघ : फखर जमान, इमाम-उल-हक, आसीफ अली, मोहम्मह हाफीज, बाबर आझम, सर्फराज अहमद ( कर्णधार), हॅरिस सोहेल, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, मोहम्मद हसनैन.  

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९पाकिस्तान