Join us  

PSL 2023: बाबर vs आमिर वादात वसीम अक्रमची उडी; म्हणाला, त्यावर टीका करू नका, मजा घ्या...

Babar vs Amir rivalry in PSL: सध्या वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरची पाकिस्तान सुपर लीगमध्ये खूप चर्चा होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 1:18 PM

Open in App

wasim akram । नवी दिल्ली : पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) थरार रंगला आहे. पीएसएलमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या वादग्रस्त सेलिब्रेशनची जोरदार चर्चा आहे. मोहम्मद आमिरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसमोरही आपली कणखर वृत्ती दाखवली होती, त्यामुळे आमिरवर बरीच टीका झाली होती. एका सामन्यादरम्यान आमिरने रागाच्या भरात बाबरच्या दिशेने एक चेंडू देखील फेकला होता. आमिरच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर आमिर विरुद्ध बाबर असा ट्रेंड झाला आहे. बहुतांश क्रिकेट चाहते मोहम्मद आमिरवर टीका करत आहेत. चाहत्यांनी मोहम्मद आमिरला आपल्या कर्णधाराचा आदर करण्याचा सल्ला दिला. मात्र, पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने मात्र मोहम्मद आमिरचे समर्थन केले आहे.

अक्रमने केले आमिरचे समर्थन पीएसएलमध्ये, कराची किंग्जचा मुख्य प्रशिक्षक वसीम अक्रम याने आपला सहकारी मोहम्मद आमिरचे समर्थन केले आहे. अक्रमने म्हटले की, "अशा आक्रमकतेमुळे स्पर्धेच्या लोकप्रियतेत भर पडते. मैदानावरील अशा भांडणांवर टीका करण्याऐवजी लोकांनी त्याचा आनंद घ्यावा कारण ते सामन्यात थोडीशी स्पर्धा ठेवते, जे स्पर्धेच्या यशासाठी खूप आवश्यक आहे." 

बुधवारी रावळपिंडीतील पिंडी क्लब मैदानावर पेशावर झाल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील सामन्यात आमिरने बाबरविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. मागील काही काळापासून आमिरबद्दल अशी अटकळ होती की तो पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात परतण्याची तयारी करत आहे. या तयारीदरम्यान, आमिरने बाबरवर भाष्य करताना सांगितले होते की, अनुभवी वेगवान गोलंदाजासाठी पाकिस्तानचा बाबर किंवा टेलेंडरला गोलंदाजी करणे हे एकसारखेच आहे.

अक्रमने नेमकं काय म्हटलं?वसीम अक्रमने आमिरचे समर्थन करताना म्हटले, "मला वाटते की आमच्याकडे खूप वेळ आहे. तुम्हाला काही प्रतिस्पर्ध्याची गरज आहे आणि मी त्यासाठी तयार आहे. मी आमिरच्या समर्थनासाठी पूर्णपणे तयार आहे. आमिर ज्या पद्धतीने पीएसएल मॅच किंवा कोणत्याही मॅचसाठी जाऊन बॅट्समनशी हस्तांदोलन करून त्यांना मिठी मारतो याचा काय अर्थ आहे? हे सर्व होत असते यामुळेच पीएसएलचे सौंदर्य वाढते आहे. आपण वैयक्तिकरित्या सतत टीका करण्यापेक्षा त्याचा आनंद घेतला पाहिजे." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

 

टॅग्स :वसीम अक्रमपाकिस्तानबाबर आजम
Open in App