पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 01:26 PM2023-06-29T13:26:08+5:302023-06-29T13:26:29+5:30

whatsapp join usJoin us
pakistan former player Shahid Afridi Shares Video of kurbaned Rs 4 Crore Bull on Bakri Eid   | पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. आज जगभरात मुस्लीम बांधव बकरी ईदचा सण साजरा करत आहेत. याच निमित्ताने आफ्रिदीने एका बैलाची कुर्बानी देण्यापूर्वीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर काहींनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असताना देखील आफ्रिदीने कोट्यवधी रूपयांचा बैल खरेदी केला आहे. 

दरम्यान, आज सर्वत्र बकरी ईद साजरी होत असून नियमानुसार या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातो. याआधी मे महिन्यात आफ्रिदीने आपल्या फाउंडेशनमधून जगातील सर्वात मोठा बैल कुर्बानीसाठी दान केला होता. लक्षणीय बाब म्हणजे आफ्रिदी यंदा ईदसाठी कुर्बानी देत असलेल्या बैलाची किंमत ४ कोटी एवढी आहे. शाहिदी आफ्रिदी फाउंडेशनने या आधी एक बैल गरिबांना दान केला होता. आता बकरी ईदच्या निमित्ताने आफ्रिदीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. पाकिस्तानी रकमेनुसार या बैलाची किंमत तब्बल ४ कोटी एवढी आहे.

Web Title: pakistan former player Shahid Afridi Shares Video of kurbaned Rs 4 Crore Bull on Bakri Eid  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.