T20 World Cup Inv Vs. Pak : कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. यानंतर टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पाकिस्तानची पहिली टीम ठरली. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील (IND vs ENG) विजेत्याशी होईल.
ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघाचे विश्वचषक (T20 विश्वचषक) जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. पाकिस्तानने त्यांना विजयासाठी दिलेले 153 धावांचे लक्ष्य पाच चेंडू बाकी असताना तीन विकेट्स गमावून पूर्ण केले. पाकिस्तानच्या विजयानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ टाकून आपल्या संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय संघाला अंतिम फेरीत सामोरे जाण्याचे आव्हानही दिले.
न्यूझीलंडचा 92 साली सेमीफायनलमध्ये पराभव झाला, 99 मध्येही हरले.. आता 2022 मध्येही पराभव झाला. त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत पण त्याआधी फायनलसाठी पाकिस्तानचे अभिनंदन. पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या संघासाठी प्रार्थना केल्या. ज्या प्रकारे ते खेळत होते त्या प्रमाणे ते क्वालिफाय करतील असे वाटलेही नव्हते. झिम्बाब्वेकडून पराभव झाल्यानंतर नेदरलँड्स दक्षिण आफ्रिकेला टक्कर देतील असे होऊच शकत नव्हते. हे सर्व तुमच्या प्रार्थनांमुळे शक्य झाले आहे," असेही तो म्हणाला.