VIDEO: सेम टू सेम बुमराह! चिमुरड्याची बॉलिंग पाहून वसीम अक्रमही अवाक्

Wasim Akram : पाकिस्तानचा  वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने एका चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर करत कौतुक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:10 PM2024-07-16T12:10:12+5:302024-07-16T12:12:32+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan got Little Bumrah Wasim Akram was also stunned to see him | VIDEO: सेम टू सेम बुमराह! चिमुरड्याची बॉलिंग पाहून वसीम अक्रमही अवाक्

VIDEO: सेम टू सेम बुमराह! चिमुरड्याची बॉलिंग पाहून वसीम अक्रमही अवाक्

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Little Bumrah in Pakistan : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चर्चा जगभरात आहे. शेजारच्या पाकिस्तानातही जसप्रीत बुमराहचे असंख्य चाहते आहेत. पाकिस्तानचा वेगवाग गोलंदाज वसीम अक्रमनेही बुमराहला सर्वकालीन महान असे म्हटले आहे. बुमराहच्या गोलंदाजीने जागतिक क्रिकेटला थक्क केले आहे. तरूण आणि लहान मुलांमध्येही बुमराहची ॲक्शन लोकप्रिय आहे. त्यामुळे अनेकजण त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच पाकिस्तानातील एका चिमुकल्याचा थक्क करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमधून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग ॲक्शनची हुबेहुब नक्कल करताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. गेल्याच महिन्यात झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जसप्रीत बुमराह टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. आता पाकिस्तानचा व्हायरल  व्हिडिओ पाहिल्यानंतर स्विंगचा सुलतान म्हटला जाणाऱ्या वसीम अक्रम देखील प्रभावित झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा बुमराहप्रमाणेच ॲक्शनमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. हे पाहून वसीम अक्रमने एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करत  हा मुलगा अगदी बुमराहसारखे असल्याचे म्हटलं. "वाह जी व्वा,या मुलाची बॉलिंग ॲक्शन आणि त्याचे नियंत्रण पहा...जस्प्रीत बुमराहप्रमाणेच, माझ्यासाठी हा दिवसातील सर्वोत्तम व्हिडिओ, क्रिकेटला सीमा नसते," असे अक्रमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर वसीम अक्रमची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. 

दरम्यान, वसीम अक्रमने याआधीही जसप्रीत बुमराहचे खुलेपणाने कौतुक केले आहे. बुमराह हा या पिढीचा सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज कसा बनला आहे याबद्दलही त्यांनी भाष्य केलं होतं. दुसरीकडे, टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देण्यात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. बुमराहने एकूण १५ विकेट घेतल्या होत्या. अंतिम सामन्यातही बुमराहने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला सामना जिंकून दिला.
 

Web Title: Pakistan got Little Bumrah Wasim Akram was also stunned to see him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.