PAK vs NZ T20 Series: पाकिस्तानी संघ आगामी काळात मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. भारतात आयपीएलचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे. आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे कानाडोळा केला. ते आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेला उपलब्ध नसणार आहेत. मायकेल ब्रेसव्हेलच्या नेतृत्वातील किवी संघाची घोषणा झाली आहे. यावरून 'क्रिकेट पाकिस्तान'ने न्यूझीलंडच्या खेळाडूंना लक्ष्य करताना किवी संघाचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये बाकावर असल्याचे सांगितले. (PAK vs NZ)
आयपीएलच्या नियमानुसार एका संघात केवळ ४ परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. न्यूझीलंडच्या खेळाडूंपैकी केन विल्यमसन (गुजरात टायटन्स), ट्रेन्ट बोल्ट (राजस्थान रॉयल्स), रचिन रवींद्र (चेन्नई सुपर किंग्ज), आणि डेरिल मिचेल (चेन्नई सुपर किंग्ज) यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. किवी संघाच्या उर्वरित खेळाडूंना संधी मिळत नसल्याची टीका शेजाऱ्यांनी केली. एकूणच पाकिस्तान दौऱ्यावर न आल्याने पाकिस्तानने किवी संघातील वरिष्ठ खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स आणि मॅट हेनरी यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला १८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या संघातील वरिष्ठ खेळाडू पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेला मुकणार आहेत. यामध्ये ट्रेन्ट बोल्ट, केन विल्यमसन, टीम साऊदी, डेव्हिड कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, विल यंग आणि टॉम लॅथम हे न्यूझीलंडच्या संघाचा भाग नाहीत.
पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ -मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.
PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
- १८ एप्रिल - रावळपिंडी
- २० एप्रिल - रावळपिंडी
- २१ एप्रिल - रावळपिंडी
- २५ एप्रिल - लाहोर
- २७ एप्रिल - लाहोर