IND vs PAK T20 World Cup 2022: "आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो"; PCBच्या अध्यक्षांचे विधान

India vs Pakistan T20 World Cup 2022: अब्जावधींचा मालक असलेल्या भारताला हरवल्याचं श्रेय पाकिस्तानी संघाला द्यायलाच हवं, असेही PCBचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले. तसेच, भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे मानसिक लढाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 03:58 PM2022-10-08T15:58:24+5:302022-10-08T16:03:04+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan have always been the underdogs in World Cup But now India have started to give us respect says PCB Chief Ramiz Raja | IND vs PAK T20 World Cup 2022: "आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो"; PCBच्या अध्यक्षांचे विधान

IND vs PAK T20 World Cup 2022: "आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो"; PCBच्या अध्यक्षांचे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2022 मध्ये टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. गेल्या T20 विश्वचषकात भारतालापाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारताला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. याचदरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध आणि खेळाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ही एक मानसिक लढाई असते आणि यात विजय मिळवणे खूपच कठीण आहे, असे रमीज राजा यांचे म्हणणे आहे. तसेच, विश्वचषकात पाकिस्तानला आधी 'अंडरडॉग' मानले जात होते, पण आता परिस्थिती बदलू लागली असून भारतीय संघही पाकिस्तानी संघाचा आदर करू लागला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

"आता भारतदेखील आमचा आदर करतो"

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले, "भारत-पाक क्रिकेट सामना ही कौशल्य आणि प्रतिभेपेक्षाही मानसिक लढाई आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल, तर तुम्ही हा सामना नक्कीच जिंकू शकता. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला नेहमीच 'अंडरडॉग' मानले जात होते, पण आता भारतानेही आम्हाला आदर देण्यास सुरुवात केली आहे. याचे श्रेय पाकिस्तानला द्यायलाच हवे, कारण आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत आणि अब्जावधी डॉलर्सचा मालक असलेल्या क्रिकेट संघाला हरवत आहोत. आमच्याकडे भारतापेक्षा कमी साधने आणि सोयी आहेत, पण तरीही आम्ही त्यांच्या संघाला चांगलीच धूळ चारली आहे."

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नसली तरीही दोन्ही संघ ICC च्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतच असतात. नुकतेच आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यात भारताने एक सामना जिंकला तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्याकडे लागल्या आहेत. विश्वचषकातील दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना असणार आहे.

Web Title: Pakistan have always been the underdogs in World Cup But now India have started to give us respect says PCB Chief Ramiz Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.