World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

ICC World Test Championship standings 2023 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:21 PM2022-07-05T19:21:15+5:302022-07-05T19:21:54+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan have jumped above India in the ICC World Test Championship standings after the latter were penalised for slow over-rate in the Edgbaston Test | World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Test Championship standings 2023 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारतावर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून WTC23 Finals चा मार्ग खडतर केला होता. त्यात आयसीसीने सामन्यातनंतर भारतीय संघावर कारवाई केली आणि त्याचा फायदा पाकिस्तानला झाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत षटकांची मर्यादा संथ ठेवल्यामुळे भारताला मॅच फीमधील ४० टक्के रक्कम दंड म्हणून  भरावी लागणार आहे. त्याचवेली WTC 23 गुणांतील दोन गुण वजा करण्याचाही निर्णय आयसीसीने घेतला. त्यामुळे भारताची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. पाकिस्तान एक स्थान वर सरकला आहे.

टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हान

भारताने विजयासाठी ठेवलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६)  यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासोबत इंग्लंडने कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.  

या पराभवानंतर भारतीय संघ ७७ गुणांसह WTC 23 Point Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडने ६४ गुणांसह सातव्या स्थानावर कूच केली आहे. ऑस्ट्रेलिया ८४ गुण व ७७.७८ टक्क्यांसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका ६० गुण व ७१.४३ टक्क्यांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, आयसीसीच्या कारवाईनंतर भारताचे ७५ गुण झाले आणि ५२.०८ अशी टक्केवारी झाली. त्यामुळे ५२.३८ टक्के असलेला पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आयसीसीच्या २.२२ कलमाखाली आयसीसीने ही कारवाई केली आहे.   


 

WTC 2021-23 भारताचे किती सामने शिल्लक?  
२ कसोटी वि. बांगलादेश ( दौरा) आणि ४ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( घरच्या मैदानावर); आता भारताला बांगलादेश दौऱ्यावरील दोन्ही कसोटी व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी जिंकाव्या लागतील, तर आणि तरच ते जागतिक कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार आहेत.  

Web Title: Pakistan have jumped above India in the ICC World Test Championship standings after the latter were penalised for slow over-rate in the Edgbaston Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.