Mickey Arthur | नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध (PAK vs NZ) वन डे मालिका खेळत आहे. किवी संघाचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. पाकिस्तानने पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून शानदार सुरूवात केली आहे. अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात होणारा विश्वचषक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. अशातच संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी एक मोठे विधान केले आहे.
भारतात होणारा वन डे विश्वचषक जिंकायचा हे पाकिस्तानी संघाचे लक्ष्य असल्याचे आर्थर यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानी संघाने विश्वचषकापर्यंतच न थांबता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका देखील जिंकायला हवी. हे सर्वात कठीण आव्हान आहे पण अशक्य नाही, असेही आर्थर यांनी म्हटले.
विश्वचषक जिंकणे आमचे ध्येय - आर्थर "विश्वचषक जिंकणे हे आमचे ध्येय आहे. दुसरे ऑस्ट्रेलियाला जाऊन कसोटी मालिका जिंकणे हे आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळताना मी याचा अनुभव घेतला त्यामुळे मी नशीबवान आहे आणि यापेक्षा चांगले काहीही नाही. ही दोन अतिशय साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे आहेत", असे दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि पाकिस्तानचे विद्यामान प्रशिक्षक आर्थर यांनी अधिक सांगितले. खरं तर आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी पाकिस्तानात आशिया चषकाची स्पर्धा पार पडणार आहे, पण आशिया चषकातील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत.
पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका
- २७ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
- २९ एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
- ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
- ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
- ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"