कोरोना व्हायरसच्या संकटात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गोलंदाजांना आता चेंडू चमकावण्यासाठी थूंकीचा वापर करता येणार नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यातून तोडगा काढण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. पण, इतक्या वर्षांपासून चेंडू चमकावण्यासाठी थूंकी किंवा घामाचा वापर करण्याची सवय सहज मोडणे शक्य नाही. ती सवय लागावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार मिसबाह उल हक यांनी एक जुगाड सुचवला आहे.
OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!
खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड
क्रिकेट बाझ या यू ट्यूब चॅनलवर बोलताना मिसबाह यांनी सांगितले की,''चेंडू चमकावण्यासाठी थूंकी किंवा घामाचा वापर करण्यापासून गोलंदाजांना रोखणं अवघड आहे. क्रिकेटच्या सुरुवातीपासून त्यांनी ही सवय लागली आहे. नवीन नियमाची जाण खेळाडूंनाही आहे, परंतु ही सवय सहजपणे जाणं अवघड आहे. त्यामुळे गोलंदाजांना या नव्या नियमांची सवय लावण्यासाठी काहीतरी करायला हवं. गोलंदाजांना मास्क घालायला लावणं किंवा तसंच काहीतरी उपाय शोधायला हवा.''
त्यांनी पुढे सांगितले की,''कोरोना व्हायरसचं औषध सापडेपर्यंत आपल्याला या नव्या नियमांचे काटेकोर पालन करायलाच हवं. हळुहळू आणि काळजी घेऊन क्रिकेटची सुरुवात करायला हवी. बदललेल्या परिस्थितीत खेळणं सोपं नाही, याची जाण खेळाडूंनीही ठेवायला हवी.''
सध्या विंसी प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू झाली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे.