Asia Cup 2023 : जगातील भेदक गोलंदाजांची फौज अन् नंबर १ फलंदाज बाबर आजम संघात असल्यानंतरही पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. सुपर ४ मध्ये श्रीलंकेकडून झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपले अन् जेतेपदाचे स्वप्न भंगले. खरं तर पाकिस्तानने स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, परंतु दुखापतीचे ग्रहण लागले अन् त्यांचे प्रमुख गोलंदाज जायबंदी झाले. त्यानंतर भारतीय संघाने त्यांना धू धू धुतले अन् श्रीलंकेने नमवले... या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम खेळाडूंवर प्रचंड संतापल्याच्या बातम्या पाकिस्तानच्या मीडियाने दिल्या आहेत.
हरला भारत, झळ बसली पाकिस्तानला! आशिया चषकात ओढावली नामुष्की
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर मैदानावरून हॉटेलमध्ये गेल्यानंतर बाबरने खेळाडूंची खरडपट्टी काढली. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना म्हटले की तुम्ही स्वतःला सुपरस्टार समजू नका, स्वतःची कामगिरी सुधारा. वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि तुम्ही असंच खेळाल, तर तुम्हाला कुणीच स्टार म्हणणार नाही. श्रीलंकेविरुद्ध एक संघ म्हणून आपण खेळलो नाही आणि कुणीच मनापासून खेळतोय असं जाणवलं नाही.
यापुढेही ड्रेसिंग रुममध्ये वाद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
- बाबर आजमने यावेळी खेळाडूंना तुम्ही संघ म्हणून खेळला नाहीत, असा आरोप केला
- त्याच्या या विधानाने शाहीन शाह आफ्रिदी मध्येच बोलला अन् तो म्हणाला किमान ज्यांनी चांगला खेळ केलाय त्यांचे कौतुक कर
- बाबरला त्याचे हे मध्ये बोलणे नाही आवडले अन् त्याने लगेच उत्तर दिले की मला माहित्येय कोणी चांगली कामगिरी केलीय ते
- दोघांमधील वाद अजून चिघळणार असे दिसताच मोहम्मद रिझवानने मध्यस्थी केली अन् भांडण थांबवले
Web Title: Pakistan heated dressing room argument : Babar Azar told players they're not playing responsibly, Shaheen interrupt him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.