Join us  

सरकारची परवानगी, तरीही पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात यायला घाबरतोय; आता म्हणतात... 

ICC ODI World Cup 2023 - पाकिस्तान सरकारनने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बाबर आजम अँड टीमला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 5:27 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 - पाकिस्तान सरकारनने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बाबर आजम अँड टीमला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) BCCI आणि ICC ला वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी सुरक्षेच्या पाहणीसाठी विनंती करणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात येण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेची चिंता कायम आहे. १४ सदस्यीय पॅनेलने अहमदाबादमधील IND vs PAK खेळाबाबत चिंता व्यक्त केली. “आम्ही या चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही अपेक्षा करतो की, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत भेटीदरम्यान त्यांची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केली जाईल,” असे परराष्ट्र कार्यालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

जिओटीव्हीनुसार, पाकिस्तान सुरक्षा शिष्टमंडळ पाठवण्याबाबत भारत आणि आयसीसीशी संपर्क साधेल. शिष्टमंडळ पाठवण्याबाबत करार झाला तर ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात भारताला भेट देतील, असेही त्यात म्हटले आहे. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, स्पर्धेचे अस्थिर स्वरूप लक्षात घेऊन पीसीबीने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सुरक्षेबाबत आधीच आक्षेप घेतला आहे. ''खेळ हे राजकारणात मिसळू नये, असे पाकिस्तानने सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी आमचा क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

अहमदाबाद येथे आयपीएल २०२३ फायनल दरम्यान चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यापूर्वी, पीसीबीने २०२३ च्या वर्ल्ड कपदरम्यान त्यांच्या संघाच्या सुरक्षेसाठी बीसीसीआय आणि आयसीसी या दोघांकडून लेखी सुरक्षा हमी मागितली होती.  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या आठवड्याच्या सुरुवातीला बाबर आजम आणि टीमच्या सहभागावर चर्चा करण्यासाठी १४ सदस्यीय समिती नियुक्त केली होती. आता त्यांना हिरवा कंदील देण्यात आला आहे.

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. परिणामी, पाकिस्तानमध्ये केवळ चार सामन्यांसह ही स्पर्धा श्रीलंकेत हलवावी लागली. पीसीबी यापूर्वी सूड म्हणून भारतात न येण्याचा आग्रह धरत होता परंतु त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मवाळ केली आहे. बाबर आजमचा संघ हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या पाच ठिकाणी खेळणार आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तान
Open in App