पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर यानं एक अजब दावा केला आहे. कारगिल युद्धात सीमेवर लढण्यासाठी मी नॉटिंगहॅमशायर क्लबसोबतचा 1 कोटी 71 लाखांचा करारावर पाणी सोडले, असा दावा रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोलंदाजानं केला. 1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध झाले होते आणि त्यात भारतानं विजय मिळवला होता.
26 जुलैला या शौर्यगाथेला 21 वर्ष पूर्ण झाले. या 21 वर्षांत पाकिस्तानने भारतात अनेक अतिरेकी कारवाया केल्या, परंतु रणांगणात भारत पाकिस्तानला कायम वरचढ ठरला आहे. या युद्धात पाकिस्तानसाठी युद्धभूमीवर उतरण्यास सज्ज होतो आणि गरज पडल्यास जीवाची बाजीही लावली असती, असेही अख्तरने सांगितले.
तो म्हणाला,''मला त्यावेळी 1 लाख 75 पाऊंडचा नॉटिंगहॅमकडून करार होता. त्यानंतर 2002मध्ये मला मोठ्या कराराची ऑफर होती. मी कारगिल युद्धासाठी त्या दोन्ही करारावर पाणी सोडलं. मी त्यावेळी लाहोरच्या बाहेरच होतो. तेव्हा तू येथे काय करतोस, असे जनरलनं मला विचारलं. युद्ध कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतं आणि देशासाठी जीवही देण्यास तयार आहे. त्यासाठी मी दोनवेळा कौंटी क्रिकेट सोडलं. मी त्याची पर्वा केली नाही. मी काश्मीरमधील माझ्या मित्रांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी युद्धासाठी सज्ज आहे.''
PakPassion ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हा दावा केला. ''भारताकडून आलेल्या लढाऊ विमानांनी जेव्हा आमच्या येथील झाडांना पाडलं, ते आमच्यासाठी मोठं नुकसान होतं. त्यांनी 6-7झाडं पाडली. मला खूप वेदना झाल्या होत्या. मला चक्कर आल्यासारखं वाटत होतं आणि मी झोपेतून दचकून उठायचो. हे असं बरेच दिवस सुरू होतं,''असेही त्यानं सांगितलं.
आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!
मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत