Join us  

व्हिसा नसताना भारतात मिळालेली मदत अन् पत्नीचा मृत्यू; लाईव्ह शोमध्ये अक्रमला अश्रू अनावर

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला यंदाच्या पर्वात खास कामगिरी करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 2:05 PM

Open in App

भारतात सुरू असलेल्या वन डे विश्वचषकाचे विश्लेषण करताना अनेक माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला यंदाच्या पर्वात खास कामगिरी करता आली नाही. शेजाऱ्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला अन् त्यांचा संघ विजयाच्या पटरीवरून खाली गेला. पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रम देखील विश्वचषकाचे विश्लेषण करत आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रडताना दिसतो. पाकिस्तानमधील एका लाईव्ह टीव्ही शोमध्ये बोलताना अक्रम भावुक झाल्याचे दिसले. खरं तर अक्रमच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख झाला अन् पाकिस्तानच्या माजी खेळाडूला रडू कोसळले. 

दरम्यान, वसिम अक्रम आणि त्याची पत्नी एअर ॲम्ब्युलन्सने लाहोरहून सिंगापूरला जात असताना चेन्नईमध्ये इंधन भरण्यासाठी फ्लाइटला थांबावे लागले. विमान प्रवासादरम्यान अक्रमची पहिली पत्नी हुमा ही बेशुद्ध झाली आणि तिला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसिम आणि हुमा यांच्याकडे भारतीय व्हिसा नव्हता पण भारत सरकारने त्यांना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. या घटनेबद्दल बोलताना तो यापूर्वी देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

वसिम अक्रम भावुक अक्रमच्या पहिल्या पत्नीला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने तिला पुन्हा शुद्ध आली नाही. त्यानंतर हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्येमुळे हुमाचा मृत्यू झाला. अक्रमने ए स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले, "तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते पण. आम्ही तिथे ५ दिवस राहिलो पण तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मी ही बातमी माझी मुले तहमूर आणि अकबर यांना दिली. 

कोण होती हुमा?वसिम अक्रमची पहिली पत्नी हुमाचा वयाच्या ४२व्या वर्षी २५ ऑक्टोबर २००९ रोजी चेन्नईतील अपोलो रूग्णालयात मृत्यू झाला होता. १९९० च्या दशकात पाकिस्तानी संघाची कमान अक्रमच्या हाती होती. त्या कालावधीत हुमाने एक मानसशास्त्रीय विशेषज्ञ म्हणून संघासोबत काम केले. इथूनच अक्रम आणि हुमा यांच्या नात्याची सुरूवात झाली आणि त्यांनी १९९५ मध्ये लग्न केले. हुमाच्या निधनानंतर वसिमने मूळची ऑस्ट्रेलियातील असलेल्या शनीरा थॉम्पसनसोबत लग्न केले. 

टॅग्स :वसीम अक्रमभारतपाकिस्तान