Wasim Akram: चेन्नईत अचानक पत्नी बेशुद्ध, हतबल झालेलो...; वसिम अक्रमला तेव्हाच समजले खरे भारतीय

wasim akram wife huma: पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने त्याच्यासोबत चेन्नई विमानतळावर घडलेल्या घटनेला उजाळा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:34 PM2023-02-27T16:34:57+5:302023-02-27T16:35:38+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan legend Wasim Akram says he will never forget the humanity shown by Indians at Chennai airport while his wife was unconscious   | Wasim Akram: चेन्नईत अचानक पत्नी बेशुद्ध, हतबल झालेलो...; वसिम अक्रमला तेव्हाच समजले खरे भारतीय

Wasim Akram: चेन्नईत अचानक पत्नी बेशुद्ध, हतबल झालेलो...; वसिम अक्रमला तेव्हाच समजले खरे भारतीय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

wasim akram wife | नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने त्याच्यासोबत चेन्नईविमानतळावर घडलेल्या घटनेला उजाळा दिला असून त्या घटनेसाठी मी भारताला कधीही विसरू शकत नाही, असे म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी बेशुद्ध झाली होती आणि भारताचा व्हिसा नसतानाही तिला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात आली होती. खरं तर वसीम अक्रमने भारताने दाखवलेल्या माणुसकीला कधीच विसरणार नसल्याचे म्हटले आहे. 

व्हिसाची परवानगी नसतानाही पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले - अक्रम
स्पोर्ट्सस्टारशी संवाद साधताना वसीम अक्रमने सांगितले, "मी माझ्या दिवंगत पत्नीसोबत सिंगापूरला जात होतो. विमानाला इंधन भरण्यासाठी चेन्नईत उतरावे लागले. आम्ही उतरलो तेव्हा माझी पत्नी बेशुद्ध पडली. मी रडत होतो आणि चेन्नई विमानतळावर लोकांनी मला ओळखले. आमच्याकडे भारताचा व्हिसा नव्हता. आमच्या दोघांकडे पाकिस्तानी पासपोर्ट होते. चेन्नई विमानतळावरील लोक, सुरक्षा दल आणि अधिकाऱ्यांनी मला व्हिसाची काळजी करू नका असे सांगितले आणि माझ्या पत्नीला रुग्णालयात नेले. एक क्रिकेटर म्हणून आणि माणूस म्हणून मी कधीही विसरू शकणार नाही अशी ही गोष्ट आहे." 

... म्हणून सचिन महान फलंदाज आहे - अक्रम 
याच चर्चेदरम्यान, वसीम अक्रमने 1999 मधील चेन्नई कसोटीशी संबंधित एक मोठा खुलासा केला. तो म्हणाला, "चेन्नई कसोटी सामना माझ्यासाठी खूप खास आहे. खूप गर्मी होती आणि खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत होता जे आम्हाला खूप अनुकूल होते. कारण आम्हाला चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी मदत मिळत होती. याशिवाय सकलेन मुश्ताकच्या रूपात आमच्याकडे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होता. त्यावेळी त्याच्याशिवाय कोणीही 'दुसरा' फिरकी गोलंदाज टिकू शकला नसता. पहिल्या डावानंतर सचिन तेंडुलकरने त्याला खूप चांगले खेळले. जेव्हा जेव्हा सकलेन गोलंदाजी करायचा तेव्हा सचिन यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू पाठवायचा आणि म्हणूनच सचिन हा महान फलंदाज आहे." 

"भारताला विजयासाठी 20 धावांची गरज होती. तेंडुलकर 136 धावांवर फलंदाजी करत होता आणि मी सकलेनला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकून चेंडूला थोडी हवा देण्यास सांगितले. सचिन मिडविकेटवर मारण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तेच घडले. सचिनने त्याला षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याचा झेल घेतला", असे वसिम अक्रमने अधिक सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

Web Title: Pakistan legend Wasim Akram says he will never forget the humanity shown by Indians at Chennai airport while his wife was unconscious  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.