पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) हा त्याच्या देशात प्रचंड लोकप्रिय आहे. त्याने नुकतीच नवी इनिंग्ज सुरू करताना एक शो घेऊन आला आहे आणि पहिल्याच एपिसोडमध्ये त्याने माती खाल्ली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये त्याने दोन महिला पाहुण्यांना असा प्रश्न विचारला की त्या दोघींना स्मृतीभ्रंश झाल्यासारखे झाले.
अख्तरने त्याच्या पाहुणीला प्रश्न विचारला की, पाकिस्तानने १९९२चा वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला होता? अख्तरच्या या प्रश्नानंतर दोन्ही पाहुण्या एकमेकिंकडे पाहू लागल्या. अख्तरने तो प्रश्न पुन्हा विचारला, परंतु त्याला नेमकं कायम म्हणायचं हेच पाहुण्यांना कळेना. कारण, त्या प्रश्नातच उत्तर दडलं होतं.
जिला प्रश्न विचारला, तिला दुसरी पाहुणी मदत करायला आली. १९९२ हे उत्तर आहे असे तिने तिला सांगितले. अख्तरने प्रश्न बदलला आणि विचारलं, पाकिस्तानने २००९चा वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला होता? पाहुणीने लगेच १९९२ असं उत्तर देऊन स्वतःची सुटका करून घेतली.
पाकिस्तानने २००९ मध्ये युनिस खानच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने १३८ धावा केल्या. कुमार संगकाराने ५२ चेंडूंत ६४धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात शाहिद आफ्रिदीने अर्धशतक झळकावून पाकिस्तानला १८.४ षटकांत विजय मिळवून दिला.
त्याआधी १९९२मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानने २४९ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर इंग्लंडला २२७ धावांवर गुंडाळले होते. इम्रान खानने ७२ धावा केल्या आणि १ विकेटही घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"