न्यूझीलंडचा संघ १८ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर दाखल झाला आहे. १७ सप्टेंबरपासून पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे, परंतु या मालिकेला ICC World Cup Super Leagueचा दर्जा नाही. त्यामुळे पाकिस्तानला ही मालिका द्विदेशीय मालिका म्हणूनच खेळावी लागेल. या मालिकेत DRSचा वापर होणार नसल्यानं World Cup Super Leagueमधील गुण त्यांना मिळणार नाही आणि पाकिस्तान व न्यूझीलंड यांनी ही बाब मान्य केली आहे.
''न्यूझीलंड २०२२-२३च्या विंडोत पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर येईल. त्यावेळी दोन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल. त्यावेळी वन डे मालिकेचा World Cup Super Leagueमध्ये समावेश केला जाईला आणि २०२३च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेसाठी ते गुण महत्त्वाचे ठरतील,''असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) सांगितले.
सुपर लीगमध्ये १२ पूर्ण सदस्यांसह नेदरलँड्स या तेराव्या संघाचा समावेश आहे आणि यातून कोणते संघ २०२३च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळतील हे निश्चित होईल. यजमान भारतासह अव्वल ७ संघ २०२३च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळेल. तळाच्या पाच संघांना पात्रता फेरीतून जावे लागेल. प्रत्येक संघाला विजयासाठी १० गुण मिळतील आणि सामना अनिर्णीत, रद्द किंवा बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ५ गुण मिळतील.
पाकिस्ताननं आतापर्यंत World Cup Super Leagueमध्ये ९ सामने खेळले आहेत आणि चार विजय मिळवून ४० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडनं तीनही सामने जिंकून ३० गुणांची कमाई केली आहे.
पाकिस्तान वि. न्यूझीलंड वन डे मालिका
१७ सप्टेंबर - पहिली वन डे, दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू
१९ सप्टेंबर- दुसरी वन डे, दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू
२१ सप्टेंबर, तिसरी वन डे, दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू
Web Title: Pakistan-New Zealand ODIs not to be part of World Cup Super League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.