चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी तिरंगी वनडे मालिकेतील न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम याने मोठा डाव साधला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षाही वेगाने ६ हजार धावांचा पल्ला गाठत त्याने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केलीये. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यात तो मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयशी ठरला. ३४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने संघाच्या धावसंख्येत फक्त २९ धावांची भर घातली. पण या अल्प खेळीत त्याने वनडेत सर्वात जलदगतीने ६ हजार धावांचा पल्ला सर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीपेक्षा फास्ट ठरला बाबर आझम
बाबर आझमनं १२६ व्या सामन्यातील १२३ व्या डावात हा पल्ला पार केला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला याने १२३ डावात हा मैलाचा पल्ला सर केला होता. वनडेत सर्वात जलदगतीने ६ हजार धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत आता हाशिम आमलासह बाबर आझम संयुक्तरित्या नंबर वन आहेत. विराट कोहलीने २०१४ मध्ये हैदराबादच्या मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात ६००० धावांचा टप्पा पार केला होता. यासाठी त्याला बाबर आणि आमलाच्या तुलनेत १० डाव अधिक खेळावे लागले.
जलदगतीने ६ हजार धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये लागतो वॉर्नर अन् केनचाही नंबर
वनडेत सर्वात जलदगतीने ६ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हाशिम आमला आणि बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यानंतर केन विलियम्सनचा नंबर लागतो. त्याने १३९ डावात हा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरनं ६ हजार धावांचा कॉर्नर पार करण्यासाठी १३९ वेळा बॅटिंग केली होती.
वनडेत सर्वात जलगतीने ५ हजार धावांचा पला गाठणारा बॅटर ठरला होता बाबर, पण..
मे २०२३ मध्ये बाबर आझनं अवघ्या ९७ सामन्यांमध्ये ५,००० धावांचा पल्ला गाठला होता. जलदगतीनं इथपर्यंत पोहचण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला. ६ हजार धावांचा पल्ला तो यापेक्षा अधिक वेगाने पार करेल, अशी अपेक्षा होती. पण वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो सातत्याने खराब कामगिरी करताना दिसून आले. बाबरने अखेरच्या सात वनडेत फक्त दोन वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे.
Web Title: Pakistan ODI Tri-Series NZ vs PAK Final Pakistans Babar Azam Record Faster Than Virat Kohli To Complete 6000 runs in ODIs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.