लाहोर : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्यानंतर पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे. पाकिस्तानच गोलंदाज हसन अली हरयाणा येथील मेवात जिल्ह्यातल्या शामिया आरझूसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा काल दिवसभर चालल्या. पण, अजून लग्न ठरलं नसल्याचे हसन अलीनं स्पष्ट केलं. शामियाचे कुटुंबिय लग्नासाठी दुबईत जाणार आहेत, अशाही चर्चा होत्या. पण, दोन्ही घरातील कुटुंबियांची अजून भेट झालेली नाही. ती लवकरच होईल आणि त्याची घोषणक करण्यात येईल, असे हसनने सांगितले. तो म्हणाला,'' माझं लग्न अजून ठरलेलं नाही. आमचे कुटुंबातील सदस्य अजून एकमेकांना भेटलेले नाहीत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.''
शामिया एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली आहे. हा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडणार आहे. शामियाचे वडील लियाकत अलीने सांगितले की, "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले होते व त्यांच्याशी आमचा आजही संपर्क आहे.''
वाघा बॉर्डरवर केली होती 'कार्टून'गिरीइंग्लंड आणि आयर्लंड दौ-यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा ट्रेनिंग कॅम्प सुरू होता. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी संघाला वाघा बॉर्डरवर नेण्यात आलं होतं. वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानकडून परेड सुरू असतानाच अचानक हसन अलीनं विकेट घेण्याच्या अंदाजात भारतीय जवानांकडे पाहून हावभाव केले. बळी मिळवल्यानंतर जसा आनंद साजरा केला जातो, तसेच हावभाव तो भारतीय जवानांकडे पाहून करत होता. यानंतर हसन अलीला भारतीयांनी असं संबोधलं होते.
हसननं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं चार सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या होत्या, पण 38 षटकांत त्यानं 256 धावा दिल्या. हसननं आतापर्यंत 53 वन डे आणि नऊ कसोटी सामन्यांत एकूण 88 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 सामन्यांत 35 विकेट्स आहेत.