Join us

आशिया कपनंतर शाहीन आफ्रिदी करणार पुन्हा लग्न; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Shaheen Afridi To Marry Again : आशिया चषक २०२३ नंतर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:03 IST

Open in App

Shaheen Afridi : आशिया चषक २०२३ नंतर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. शाहीनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केले आहे. आता पुन्हा एकदा तो अंशाशी लग्न करणार आहे. माहितीनुसार, शाहीन पुन्हा एकदा अंशासोबत लग्न करणार असून १९ सप्टेंबरला हा विवाहसोहळा पार पडेल.

खरं तर शाहीन आफ्रिदीच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि उप कर्णधार शादाब खानसारखे खेळाडूही या लग्नात दिसले होते. आता दुसऱ्यांदा शाहीन आणि अंशाला त्यांचे लग्न थाटामाटात साजरे करायचे आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहीनचे दुसरे लग्न आशिया चषकाच्या अंतिम सामन्याच्या दोन दिवसांनी अर्थात १९ सप्टेंबरला होणार आहे, तर २१ सप्टेंबरला रिसेप्शन असेल. यापूर्वी शाहीन आणि अंशाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले होते.

शाहीन आफ्रिदी सध्या आशिया चषकासाठी श्रीलंकेत आहे. पाकिस्तानचा संघ पुढील सामना १० सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. या आधी २ सप्टेंबरला हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडले होते तेव्हा तो सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. सध्या आशिया चषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाहीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ३ सामन्यात ७ बळी घेतले आहेत. भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ३५ धावा देत ४ भारतीय फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. 

टॅग्स :एशिया कप 2023शाहिद अफ्रिदीलग्नपाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App