Join us  

BCCI तर ऐकतच नाही... आता Champions Trophy 2025 साठी पाकिस्तानची ICCच्या पुढ्यात 'रडारड';

India vs Pakistan, Champions Trophy 2025: भारताचा संघ पाकिस्तानात जाणार नाही, हे BCCIने वारंवार सांगितले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 7:57 PM

Open in App

India vs Pakistan, Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असूनही सध्या BCCIच्या दराऱ्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, अशी ठाम भूमिका BCCI ने जाहीर केली आहे. ICC च्या वार्षिक बैठकीत या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड भलताच हताश दिसत आहे. स्पर्धा कितीही मोठी असली तरीही टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PCB ने T20 वर्ल्ड कपनंतरच चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक ICC कडे सोपवले होते. असे असतानाही कोलंबो येथे झालेल्या वार्षिक सभेत वेळापत्रक आणि स्वरूपावर कोणतीही चर्चा झाली नाही. आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रीड मॉडेलनुसार घेतली जाईल, अशाच चर्चा सुरु आहेत. पण या वृत्तादरम्यान आता पाकिस्तान एक नवी चाल खेळताना दिसत आहे. BCCI ची मनधरणी करण्यासाठी आता PCB ने ICC ला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघाने पाकिस्तानात यावे, यासाठी पाकिस्तान प्रचंड प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांमुळे BCCI संघ पाठवण्यास तयार नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, PCB ने BCCI ची मनधरणी करण्याची जबाबदारी ICC ला दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान असलेल्या PCB ला जे अपेक्षित होते तेच घडले. बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रारूप आराखडा, वेळापत्रक आणि स्वरूप सादर केले. कार्यक्रमाचे बजेटही सादर केले आहे. पण आयसीसीने अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबतची चर्चा अंजेड्यावर घेतलेली नाही. त्यावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा अंतिम निर्णय घेण्याबाबत कल्पना येईल. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये, PCB ने भारताचे सर्व सामने आणि स्पर्धेतील सेमीफायनल व फायनलचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचे सुचवले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघआयसीसीबीसीसीआयपाकिस्तान