Shaheen Afridi : आफ्रिदीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शाहीननं 'बाप' होताच एक मोठा निर्णय घेतला

PAK vs BAN Test Live Score : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:37 PM2024-08-24T14:37:32+5:302024-08-24T14:37:51+5:30

whatsapp join usJoin us
pakistan player Shaheen Afridi has been blessed with a baby boy  | Shaheen Afridi : आफ्रिदीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शाहीननं 'बाप' होताच एक मोठा निर्णय घेतला

Shaheen Afridi : आफ्रिदीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शाहीननं 'बाप' होताच एक मोठा निर्णय घेतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानी संघ मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सलामीच्या सामन्यातील आज शनिवारी चौथा दिवस आहे. बुधवारी या मालिकेतील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ११३ षटकांत ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर शेजाऱ्यांनी पहिल्याच डावात मजबूत पकड बनवली. (Pakistan and Bangladesh at the Rawalpindi Cricket Stadium) मग बांगलादेशने देखील सांघिक खेळी करत मोठी धावसंख्या उभारली. या घडीला बांगलादेश चांगल्या स्थितीत असल्याचे दिसते. 

दरम्यान, कसोटी सामना सुरू असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला खुशखबर मिळाली. त्याची पत्नी अंशाने मुलाला जन्म दिला आहे. बाप झालेला शाहीन रविवारी कराचीला जाईल आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा रावळपिंडीत दाखल होईल. शाहीनच्या या निर्णयामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये अंशाने पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी लग्न केले. अंशा ही पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे.  

दरम्यान, शाहीन आणि अंशा यांचे दोनवेळा लग्न झाले. शाहीन आफ्रिदीने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अंशाशी लग्न केले होते. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांचे अनेक नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. याच कारणामुळे शाहीनने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून नातेवाईकांच्या उपस्थितीत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.

Web Title: pakistan player Shaheen Afridi has been blessed with a baby boy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.