ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. शेजारील देशातील माजी खेळाडूही आपल्या संघाला घरचा आहेर देत आहेत. अशातच पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने बाबर आझमवर सडकून टीका केली आहे. विश्वचषकात पाकिस्तानला प्रथम अमेरिका आणि त्यानंतर भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला. आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द होताच पाकिस्तान वाहून गेला.
शोएबवर टीका करताना शोएब मलिक म्हणाला की, पाकिस्तानी संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण आहे? आपला सर्वोत्तम खेळाडू हा बाबर आझम आहे. मी फक्त अव्वल चार-पाच संघांबद्दल बोलत आहे. बाबर आझम भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांसारख्या अव्वल संघांचा भाग असू शकतो का? याचे उत्तर नाही असे आहे. तो त्या स्तरावरचा खेळाडू नाही. याशिवाय बाबर आझम नेपाळच्या आंतरराष्ट्रीय संघाचा देखील भाग होऊ शकत नाही.
दरम्यान, अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने पाकिस्तानचा संघ अधिकृतपणे विश्वचषकातून बाहेर झाला. पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. १० वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी ११.४६ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत ५-५ षटकांची खेळवण्यात येणार होती. ११ वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठी ट्वेंटी-२० विश्वचषक म्हणजे एक वाईट स्वप्नच. तो संपूर्ण स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्याला चार सामन्यांमध्ये केवळ १२२ धावा करता आल्या. ४४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. १०१.६६ च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या बाबरला संथ खेळीवरूनही ट्रोल करण्यात आले.
Web Title: pakistan player Shoaib Malik said, Even Nepal won't pick Babar Azam in their team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.