जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 70,762 वर पोहोचली आहे. त्यापैकी 29 लाख 04,690 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 77,515 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. पण, आता अडीच-तीन महिन्यांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे. काही देशांमध्ये फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या आहेत, तर आता क्रिकेटही सुरू होऊ लागेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज यांच्यापाठोपाठ पाकिस्तानच्या खेळाडूंनी क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली आहे. एकीकडे कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून खेळाडू मैदानात सराव करत असताना पाकिस्तानी खेळाडूंनी नियमांना तिलांजली लावल्याचे पाहायला मिळाले आहे.
कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!
पाकिस्तानी खेळाडू मंगळवारी सरावासाठी मैदानावर उतरले. पण, त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना तिलांजली लावली. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार खेळाडूंची कोरोना चाचणीपण घेण्यात आलेली नाही.
विंडीजची सुरक्षित वातावरणात इंग्लंड दौऱ्यास मंजुरी
दरम्यान, वेस्ट इडिज क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौºयास मंजुरी प्रदान केली असून जैव सुरक्षा वातावरणात तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. ही मालिका आधी जूनमध्ये होणार होती, मात्र कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली. आता उभय संघ जुलैमध्ये कसोटी मालिका खेळतील.
क्रिकेट वेस्ट इंडिजने दिलेल्या वृत्तानुसार सीडब्ल्यूआयने कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करण्यास मंजुरी प्रदान केली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड, सीडब्ल्यू आयचे वैद्यकीय पथक यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खेळाडू आणि स्टाफला इंग्लंडमध्ये कसे ठेवायचे याची संपूर्ण योजना सोपविण्यात आली.
या योजनेचा आढावा घेतल्यानंतर दौºयास हिरवा झेंडा दाखवला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जैव सुरक्षा वातावरणात वास्तव्य करेल, शिवाय सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविले जातील. ईसीबीने ८, १६ तसेच २४ जुलै रोजी कसोटी सामने सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. हॅम्पशायर आणि ओल्ड टॅÑफोर्ड मैदानावर सामने खेळविले जातील.
लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral
"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!
ब्रिस्बनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव
समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी