Pakistan Playing XI against India, Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील दुसरी लढत उद्या कोलंबो येथे होणार आहे. सुपर ४ मधील ही लढत आहे आणि पाकिस्तानने या फेरीत एक विजय मिळवून आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगला उंचावला आहे. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांच्या येण्याने भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन अजून ठरत नाही, तेच दुसरीकडे पाकिस्तानने एक दिवस आधीच त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
भारतीय संघापेक्षा आम्ही भारी, कारण...! INDvsPAK सामन्यापूर्वी बाबर आजमनचा मोठा दावा
साखळी फेरीत पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरीस रौफ यांच्या जलद माऱ्यासमोर भारताची अवस्था ४ बाद ६६ अशी झाली होती. इशान किशन ( ८२) व हार्दिक पांड्या ( ८७) यांच्या १३८ धावांच्या भागीदारीमुळे भारताला २६६ धावांपर्यंत पोहोचला आले होते. पण, पावसामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना रद्द करावा लागला. उद्या सुपर ४ मध्ये IND vs PAK लढत होणार आहे. याही सामन्यात पावसाचा अंदाज लक्षात घेऊन राखीव दिवस ठेवला गेला आहे. त्यामुळे १० सप्टेंबरला पावसामुळे जिथे मॅच थांबेल तिथूनच ११ सप्टेंबला ती सुरू होईल.
पाकिस्तानने या सामन्यासाठी आज प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. भारताविरुद्ध ५५ धावा देणाऱ्या मोहम्मद नवाजला बांगलादेशविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केेले गेले होते. त्याच्याजागी फिरकीपटू फहीम अश्रफला संधी दिलेली आणि हाच संघ उद्या कायम ठेवला आहे. पाकिस्तानने त्यांच्या संघात कोणताच बदल केलेला नाही. फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ. असा संघ उद्या मैदानावर दिसेल.