न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) मोठा धक्का बसला. पाकिस्तान अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. न्यूझीलंड व इंग्लंड यांच्या या निर्णयामागे भारतीयांचा हात असल्याचा दावा PCB व पाकिस्ताच्या मंत्र्यांनी केला होता. त्यात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Pakistan Prime Minister Imran Khan) यांचीही भर पडली आहे. भारतीयांनी पाठवलेल्या Fake Message मुळे न्यूझीलंड व इंग्लंड क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तान दौरा रद्द केल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे.
न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता, परंतु पहिल्या वन डेला अवघे काही तास उरलेले असताना त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मैदानावर उतरण्यास मनाई केली. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं दौराच रद्द केला. या घटनेनंतर इंग्लंडच्या संघानंही पाकिस्तान दौऱ्यावर येणार नसल्याचे PCB ला कळवले. '' या निर्णयानं इंग्लंडनं स्वतःची मान खाली घातली, मला इंग्लंडकडून अशी अपेक्षा नव्हती. सिंगापूरमध्ये बसून काही भारतीयांनी फेक मॅसेज पाठवले आणि न्यूझीलंड क्रिकेटनं त्यावर विश्वास ठेऊन माघार घेतली,''असे इम्रान खान म्हणाले.
भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, त्यांच्याविरोधात जाण्याची कुणाचीच हिम्मत नाहीIndia controls world cricket- इम्रान खान म्हणाले की,''सध्या खेळाडूपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा झाला आहे. भारत हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि अशात त्यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवण्याची हिम्मत करणार नाही. इंग्लंड ज्याप्रकारे पाकिस्तानशी वागला, तसे ते भारताशी वागले नसते. त्यांना माहित्येय की इथून प्रचंड पैसा येतोय आणि त्याचा त्यांनाही फायदा होतोय. खेळाडूंनाच नव्हे तर अनेक देशांच्या क्रिकेट संघटनांना भारताकडून पैसा मिळतोय. त्यामुळेच जागतिक क्रिकेट भारत कंट्रोल करतंय.''
Web Title: Pakistan PM Imran Khan says ‘some Indian’s fake message led to England and NZ pull-out’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.