कराची : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानने 15 सदस्यीय संघ जाहीर केला. पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सर्फराझ अहमदकडे सोपवण्यात आले आहे. या संघात शोएब मलिक आणि मोहम्मद हफिझसारखे अनुभवी खेळाडू आहे. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला मात्र विश्वचषकासाठीच्या संघात निवडण्यात आलेले नाही. पाकिस्तानच्या या वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघातील सदस्यांनी शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी यावेळी वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचा अनुभव खेळाडूंशी शेअर केला आणि वर्ल्ड कप विजयासाठी काही खात टिप्सही दिल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 31 मे ला त्यांचा पहिला सामना वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे.